राष्ट्रवादीला मोठा धक्का, संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार?

विधानसभा निवडणुकीत आपला विजय पक्का करण्यासाठी संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2019 01:09 PM IST

राष्ट्रवादीला मोठा धक्का, संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार?

अहमदनगर, 17 जुलै : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत आपला विजय पक्का करण्यासाठी संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघ राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचा करत या मतदारसंघात संग्राम जगताप यांना तिकीट दिलं होतं. पण आता हेच संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर असल्याने राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार जगताप शिवसेनेत प्रवेश करू शकतात. याबाबत 'हिंदुस्तान टाईम्स' या इंग्रजी दैनिकाने वृत्त दिलं आहे.

शिवसेना प्रवेशावर काय म्हणाले संग्राम जगताप?

संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली असताना स्वत: जगताप यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मी राष्ट्रवादीसोबत असून माझा शिवसेना प्रवेश या फक्त अफवा आहेत, असा दावा आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे.

संग्राम जगताप आणि लोकसभा निवडणूक

Loading...

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. कारण राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघात भाजपकडून सुजय विखे तर राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप हे मैदानात होते.

लोकसभा निवडणुकीत यावेळी नगरची जागा खूपच गाजली. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपने लगेचच त्यांना उमेदवारीही दिली. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांना रिंगणात उतरवलं.

बहुचर्चित नगरची लोकसभेची जागा अखेर भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी तबल 2 लाख 81 हजार 474 मतांनी जिंकली. या लोकसभा मतदार संघातील 6 विधानसभेच्या जागांमध्ये डॉ. सुजय विखे यांनी आघाडी घेतली. संग्राम जगताप हे नगर शहराचे आमदार असूनही या विधानसभा मतदारसंघात सुजय विखेंनी 53122 मतांनी आघाडी घेतली होती. याच कारणामुळे संग्राम जगताप हे बॅकफूटवर गेले होते. म्हणूनच ते आता शिवसेना प्रवेशाचा विचार करत आहेत, अशी चर्चा आहे.

VIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 17, 2019 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...