सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात सरकार कुणाचेही येऊ द्या, शेवटी 'डीएनए' आमचाच...

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात सरकार कुणाचेही येऊ द्या, शेवटी 'डीएनए' आमचाच...

राज्यात आगामी काळात सत्ता कोणाची आली तरी 'कॅबिनेट' मात्र राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचेच राहणार, शेवटी आमच्यातून जे तिकडे गेले आहे. त्यांचा डीएनए आमचाच आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप-शिवसेनेला टोला लागवला.

  • Share this:

बब्बू शेख, (प्रतिनिधी)

मनमाड, 28 ऑगस्ट: राज्यात आगामी काळात सत्ता कोणाची आली तरी 'कॅबिनेट' मात्र राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचेच राहणार, शेवटी आमच्यातून जे तिकडे गेले आहे. त्यांचा डीएनए आमचाच आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप-शिवसेनेला टोला लागवला. निवडणुकीच्या 45 दिवस आदी नोटिसांचा सुळसुळाट झाला आहे. जे विरोधात बोलतात त्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत. शिखर बॅंकेशी साहेबांचा (शरद पवार) काहीही एक संबंध नाही. स्वतःचा महत्त्व वाढवून घेण्यासाठी गेल्या 50 वर्षांत असे अनेक आरोप करण्यात आले आहेत. आम्हाला सवय आहे मात्र, वाईट याचे वाटते की 80 वर्षे वय असलेल्या माणसावर तो तुम्हाला विरोध करतो म्हणून पातळी सोडून राजकारण केले जात असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

खासदार सुप्रिया सुळे यांची सध्या 'संवाद यात्रा' सुरू असून ही यात्रा नाशिक जिल्ह्यातील नांदगांव येथे आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. नंतर प्रसार माध्यमाशीही संवाद साधला. शिखर बॅंकप्रकरणी अजित पवारसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच या प्रकरणी शरद पवार यांची करण्यात येत असलेली बदनामी यावर त्यांनी मत व्यक्त केले. शिवाय राज्यात आगामी काळात सत्ता कोणाचीही आली तरी कॅबिनेट राष्ट्रवादी कॉंग्रेस-काँग्रेसचे राहणार असून शेवटी आमच्यातून जे तिकडे गेले आहे. त्यांचा 'डीएनए' हा आमचाच आहे, असा भाजप-शिवसेनेला टोला लागवला.

विशेष म्हणजे छगन भुजबळसोबत पंकज भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू असताना सुप्रिया सुळे यांचे नांदगावला आगमन झाल्यावर पंकज भुजबळ यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

गणेश नाईकांनी शिवसेनेऐवजी भाजपला का दिली पसंती? पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 09:26 AM IST

ताज्या बातम्या