अखेर तो दिवस आला! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गणेश नाईक आज भाजपचा झेंडा घेणार हाती

अखेर तो दिवस आला! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गणेश नाईक आज भाजपचा झेंडा घेणार हाती

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा दिवस अखेर आज आला आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 11 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा दिवस अखेर आज आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गणेश नाईक आज भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर नाईक समर्थकांनी ठिकठिकाणी बॅनरबाजी केली आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे 55 नगरसेवक सकाळी कोकण आयुक्तांकडे प्रतिज्ञापत्र सादर करून स्वतंत्र गटाची नोंदणी करणार आहेत.

(वाचा :'वंचित'मध्ये फूट, प्रकाश आंबेडकर या वेळी नक्की कुणाची 'वाजवणार'? उद्धव ठाकरेंचा सवाल)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा जे पी नड्डा हेदेखील नाईकांच्या भाजप प्रवेशावेळी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नाईकांनी सोडचिठ्ठी दिल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

(वाचा :भाजप सेना युतीच्या जागा वाटपाचा गुंता, शिवसेना 50 टक्के फॉर्म्युल्यावर ठाम!)

गणेश नाईक राष्ट्रवादीला खिंडार पाडणार

गणेश नाईक नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याच्या तयारीत आहेत. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांचे पूत्र संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता जिल्ह्यातील नेते, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्यांसह गणेश नाईक लवकरच प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे.

(वाचा :काँग्रेसला एकाच दिवसात दुसरा धक्का, उर्मिलानंतर आणखी एका नेत्याचा राजीनामा)

राष्ट्रवादीनेही भाजपच्या या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी हालाचाली सुरू केल्या आहेत. नवी मुंबईत नवं नेतृत्व उभं करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आता विरोधी पक्षातील नाराजांना संपर्क केला जात आहे.

राष्ट्रवादीला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, तब्बल 55 नगरसेवक भाजपात दाखल होणार!

Published by: Akshay Shitole
First published: September 11, 2019, 7:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading