राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्षच पक्ष सोडण्याच्या तयारीत? भेटीने पक्षात खळबळ

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्षच पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 09:12 AM IST

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्षच पक्ष सोडण्याच्या तयारीत? भेटीने पक्षात खळबळ

मुंबई, 26 ऑगस्ट : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि कोकणातील ज्येष्ठ नेते भास्करराव जाधव यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वार टीका केली. 'मी याआधीच पक्षाकडे मुंबईचं अध्यक्षपद मागितलं होतं. पण पक्षाने तेव्हा माझं ऐकलं नाही,' असं म्हणत भास्कर जाधव यांनी पक्षनेतृत्वार नाराजी व्यक्त केली होती. पण त्यानंतर आता भास्कर जाधव स्वत:च पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

भास्कर जाधव आणि नारायण राणे या कोकणातील दोन नेत्यांमध्ये सतत राजकीय संघर्ष होत असतो. भास्कर जाधव हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत. नुकतीच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी भास्कर जाधवांनी शिवबंधन हाती बांधल्यास राणेंना कोकणात शह देण्यासाठी शिवसेनेचा मदत होऊ शकते.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला लागलेली गळती काही थांबायची चिन्हे नाहीत. विधानसभा निवडणुकीत लोकसभेचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता दिसत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेची वाट धरली आहे. त्यानंतर आता भास्कर जाधव हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिलीय. जाधव यांच्या चर्चेच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून लवकरच हा प्रवेश होईल असं मानलं जात आहे. जाधव यांनी प्रवेश घेतला तर तो राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का असणार आहे.

राष्ट्रवादीची गळती थांबणार कशी?

बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांच्यासह इतर दोन आमदार हे शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. युतीत बार्शी हा मतदारसंघ शिवसेनेने मागितलाय. तो मतदारसंघ भाजप सेनेला देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या खास भाषणशैलीसाठी प्रसिद्ध असलेले सोपल आता शिवसेनेच्या तिकिटावर लढण्याची शक्यता आहे.

Loading...

VIDEO: 'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा महाजनादेश यात्रेवर टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 09:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...