राष्ट्रवादीच्या माजी आमदारासाठी अजित पवार मैदानात, मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

राष्ट्रवादीच्या माजी आमदारासाठी अजित पवार मैदानात, मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

सरकार राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांना विनाकारण टार्गेट करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 18 जुलै : चाकण हिंसाचार प्रकरणी सरकार राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांना विनाकारण टार्गेट करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. मराठा मोर्चावेळी चाकणमध्ये झालेल्या हिंसाचाराचा आरोप ठेऊन माजी आमदार दिलीप मोहितेच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आक्रमक भूमिका घेतली आहे.

'चाकण दंगल प्रकणी मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे. वातावरण चिघळयाण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. योग्य दिशेने तपास व्हायला हवा. कुणालाही टार्गेट करू नका,' असं अजित पवारांनी म्हटलं आहे. दुसरीकडे, हे षडयंत्र केवळ विधानसभा डोळ्यासमोर ठेऊनच केलं जात असल्याचा आरोप दिलीप मोहितेंनी केला आहे.

चाकण हिंसाचारप्रकरणी दिलीप मोहिते रडारवर?

गेल्यावर्षी चाकणमध्ये 30 जुलैला मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंद दरम्यान मोठा हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराची छळ त्यावेळी पोलिसांनाही पोहोचली होती. म्हणूनच स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी दंगलखोरांवर गुन्हे दाखल करून त्यावेळी तब्बल 84 जणांना अटकही केली. पण आता हेच जुनं प्रकरण उकरून काढून राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहितेंना अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी मोहितेंच्या घरासमोर मोठा फौजपाठाही तैनात केला गेला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून चाकण परिसरात मोठा तणावही निर्माण झाला होता.

आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊनच माझ्या अटकेचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस या वादात नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहावं लागेल.

VIDEO: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

First published: July 18, 2019, 4:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading