मुंडे Vs मुंडे, परळीतील हाय होल्टेज सामन्यासाठी धनंजय मुंडेंकडून नवं अस्त्र

मुंडे Vs मुंडे, परळीतील हाय होल्टेज सामन्यासाठी धनंजय मुंडेंकडून नवं अस्त्र

मागील निवडणुकीतील पराभवाचं उट्ट काढण्यासाठी धनंजय मुंडे यांनी नव्याने डावपेच आखले आहेत.

  • Share this:

सुरेश जाधव, बीड, 3 ऑगस्ट : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. या निवडणुकीत काही हाय होल्टेज लढतींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघातही भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे या भाऊ-बहिणीतील लढत यंदाही चुरशीची होणार आहे.

परळी मतदारसंघात बाजी मारण्यासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मागील निवडणुकीत धनंजय मुंडेंना पराभव करत पंकजा यांनी विजय खेचून आणला होता. या पराभवाचं उट्ट काढण्यासाठी धनंजय मुंडे यांनी नव्याने डावपेच आखले आहेत.

धनंजय मुंडेंची नवी रणनीती

विधानसभेला अजून काही महिने बाकी असतानाच धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांनी प्रचाराची धुरा हाती घेत मतदारांशी 'डोअर टू डोअर' संवाद यात्रा सुरू केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी परळीत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मतदारसंघातील महिलांच्या प्रश्नांसंदर्भात धनंजय मुंडेंनी पत्नी राजश्री यांना प्रचाराच्या मैदानात उतरवले आहे. यामुळे प्रीतम मुंडे आणि पंकजा या मुंडे भगिनींना टक्कर देण्यासाठी भावजय राजश्री धनंजय मुंडेंनी संवाद मोहीम हाती घेतली आहे.

दरम्यान, परळी मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार यावर सध्या चर्चेला उधाण आलं आहे. ताई,भाऊ की तिसरे आणखी कोणी? अशातच धनंजय मुंडे यांच्या सौभाग्यवती राजश्री मुंडे यांनी गेल्या काही दिवसांपासून परळी शहरातील प्रभागनिहाय महिलांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. मतदारसंघातील सामान्य महिलांना कोण कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे? त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत? या जाणून घेण्यासाठी तसंच त्या तात्काळ सोडवण्याचे काम सध्या राजश्री मुंडे करत आहेत. धनंजय मुंडेंच्या नव्या खेळीमुळे पंकजा मुंडे यांच्यासमोर आव्हान निर्माण झालं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

#MumbaiRains VIDEO: पावसाचं रौद्र रुप; ठाण्यात रस्ते, रेल्वे पाण्याखाली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 10:03 AM IST

ताज्या बातम्या