शिवस्वराज्य यात्रेला ‘प्रेतयात्रा’ म्हणणाऱ्या दानवेंवर धनंजय मुंडेंचा पलटवार, म्हणाले...

शिवस्वराज्य यात्रेला ‘प्रेतयात्रा’ म्हणणाऱ्या दानवेंवर धनंजय मुंडेंचा पलटवार, म्हणाले...

रावसाहेब दानवेंच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल करत राष्ट्रवादीने खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात राज्यात शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. ‘ही शिवस्वराज्य यात्रा नसून प्रेतयात्रा आहे,’ अशी टीका या यात्रेवर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. रावसाहेब दानवेंच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.

‘रावसाहेब दानवेजी तुम्ही बरोबर बोललात. भाजप-सेनेच्या जुलमी, असंवेदनशील, शेतकरीविरोधी सरकारची ही अंतिम यात्रा आहे. पण तुमची एक चूक दुरुस्त करतो. या हुकूमशाही सरकारला शेवटचा नमस्कार करण्यासाठी लोकं शिवस्वराज्य यात्रेला 'तुफान गर्दी' करत आहेत,’ असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रावसाहेब दानवेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?

रावसाहेब दानवे हे आपल्या गावरान भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. जालना इथल्या महाजनादेश यात्रेदरम्यान त्यांनी भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवर त्यांच्या इरसाल भाषेत भाष्य केलं. त्यांनी कार्यकर्त्यांसमोर राष्ट्रवादीच्या यात्रेची प्रेतयात्रा म्हणून खिल्लीही उडवली. तसंच राष्ट्रवादीच्या या यात्रेकडे परकीयांसोबत स्वकियांनीही पाठ फिरलवल्याचं म्हणत जोरदार टीका केली.

दरम्यान, भाजपच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने राज्यात शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. या यात्रेचा प्रमुख चेहरा म्हणून राष्ट्रवादीकडून खासदार अमोल कोल्हे यांना समोर आणण्यात आलं आहे. या यात्रेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीआधी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करण्यास राष्ट्रवादी यशस्वी होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

VIDEO: 'शरद पवारांनी तुम्हाला वडिलांसारखी दिलेली वागणूक कुठेच मिळणार नाही’, शिवेंद्रराजेंवर हल्लाबोल

First published: August 29, 2019, 2:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading