विधानसभेच्या जागावाटपात राष्ट्रवादी ठरणार 'पॉवरफुल'? काँग्रेसकडे मांडला 'हा' फॉर्म्युला

विधानसभेच्या जागावाटपात राष्ट्रवादी ठरणार 'पॉवरफुल'? काँग्रेसकडे मांडला 'हा' फॉर्म्युला

महाराष्ट्रात आघाडी करताना याआधी जागावाटपात राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस नेहमीच वरचढ राहिली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 जुलै : विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत जागावाटपासंबंधी राष्ट्रवादीकडून नवा फॉर्म्युला मांडण्यात आला आहे. आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांनी 50-50 चा फॉर्म्युला वापर समसमान जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात आघाडी करताना जागावाटपात याआधी राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस नेहमीच वरचढ राहिली आहे. पण आता चित्र बदललं असल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे. कारण मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तसंच आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी काँग्रेसच्या तुलनेत उजवी ठरली आहे. याचाच दाखला देत आता राष्ट्रवादीने 50-50 चा फॉर्म्युला मांडला आहे.

दुसरीकडे, काँग्रेसनं मात्र जागावाटबाबत नवा प्रस्ताव राष्ट्रवादीसमोर ठेवला आहे. मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा त्या-त्या पक्षाकडे राहतील. तसंच ज्या जागांवर जो पक्ष दुसऱ्या नंबरवर होता ती जागा त्या पक्षाकडे जाईल, असा काँग्रेसचा प्रस्ताव आहे. काँग्रेसच्या या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसच्या वाट्याला 106 आणि राष्ट्रवादीकडे 95 जागा जातील. तर उरलेल्या 87 जागांच्या वाटपावर मित्रपक्षांसह चर्चा होऊ शकते.

2009 मध्ये काय होता आघाडीचा फॉर्म्युला?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी 2009 मधील विधानसभा निवडणूक आव्हानात्मक असल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 174 तर राष्ट्रवादीने 114 जागा लढवल्या होत्या.

दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. आधी युती तुटली आणि त्यानंतर काही वेळातच आघाडीतही बिघाडी झाली. आघाडी तुटल्याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला महाराष्ट्रात 15 वर्षांपासून असलेली सत्ता गमवावी लागली होती.

जगभरातून लोकं येतात अजिंठा लेणी पाहायला, तिथे गर्दुल्ले फुकताय हुक्का!

First published: July 17, 2019, 8:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading