मतदानादिवशी राडा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई

मतदानादिवशी राडा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई

राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती.

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 22 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना काल (सोमवारी) पिंपरी चिंचवड़मध्ये मोठा राडा झाला. राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवानी यांना अटक करण्यात आली आहे. तसंच याच राड्याप्रकरणी शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांचे जावई बबलू सोनकरसह इतर चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

मतदान सुरू असताना बबलू सोनकर आणि त्यांचे कार्यकर्ते पिंपरी परिसरात फिरत होते. सोनकर हे दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आसवानी यांच्या घराजवळून जात होते. त्यावेळी आसवानी आणि त्यांच्या साथीदारांनी सोनकर यांची मोटार अडवली आणि त्याला लाकडी बांबू, सिमेंटचे गट्टू यांनी मारहाण केली.

या मारहाणीत सोनकर आणि कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी आमदार आसवानी यांच्याविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, डब्बू आसवानी यांनीही बबलू सोनकर आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनकर यांनी आसवानी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हातातील पिस्तुल आसवानी यांच्या डोक्याला लावली आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी जितू मंगतानी यांनी त्याच्याकडील पिस्तूल कार्यकर्त्यांना दाखवलं, असं नगरसेवक डब्बू आसवानी यांचं म्हणणं आहे.

VIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी

Published by: Akshay Shitole
First published: October 22, 2019, 3:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading