शरद पवार पुन्हा मैदानात, असा असेल प्रचाराचा झंझावाती दौरा

शरद पवार पुन्हा मैदानात, असा असेल प्रचाराचा झंझावाती दौरा

सततच्या धक्क्यानंतर राष्ट्रवादीला आलेली मरगळ झटकण्यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत.

  • Share this:

मुंबई, 7 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा तीन दिवसाचा निवडणूक प्रचार दौरा उद्यापासून सुरू होत आहे. शरद पवार यांनी पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर असा निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडे मोर्चा वळवला आहे. शरद पवार हे 8 ते 10 ऑक्टोबरपर्यंत झंझावाती दौरा करणार आहेत.

सततच्या धक्क्यानंतर राष्ट्रवादीला आलेली मरगळ झटकण्यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यातील अनेक भागांत सभा घेतल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते सरकारवर निशाणा साधत राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

शरद पवारांची सभा कुठे, कधी होणार?

- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता

- पारोळा सायंकाळी 5 वाजता

- विदर्भात अकोला जिल्ह्यातील बाळापुर येथे दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता.

- वाशिम जिल्ह्यातील मानोरा - कारंजा दुपारी 4 वाजता

- हिंगणघाट इथं दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता

- बुटीबोरी- हिंगणा 3 वाजता

- काटोल सायंकाळी 5 वाजता

SPECIAL : 'रावडी नितीन' : 'डॅशिंग' नितीन नांदगावकरांची बेधडक मुलाखत एकदा ऐकाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 01:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading