दोन दिग्गज नेत्यांनी सोडली होती शिवसेना, आता एक शिवसेना तर दुसरा करणार भाजपमध्ये प्रवेश

एकेकाळी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले दोन दिग्गज नेते पुन्हा पक्षबदलाच्या तयारीत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2019 09:39 AM IST

दोन दिग्गज नेत्यांनी सोडली होती शिवसेना, आता एक शिवसेना तर दुसरा करणार भाजपमध्ये प्रवेश

मुंबई, 30 ऑगस्ट : राजकारणात काहीही अशक्य नाही असं म्हटलं जातं. विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातही याचाच प्रत्यय येत आहे. एकेकाळी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले दोन दिग्गज नेते पुन्हा पक्षबदलाच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीचे मातब्बर नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना तर राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या घडामोडींना वेग आला आहे.

पक्षांतर्गत हेवेदाव्यांमुळे छगन भुजबळ यांनी जवळपास 28 वर्षांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या मतभेदांमुळे नारायण राणे यांनीही शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शिवसेना सोडून छगन भुजबळ हे आधी काँग्रेसमध्ये आणि नंतर शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीत दाखल झाले. तर नारायण राणे हे काँग्रेसमध्ये राहिले.

छगन भुजबळ आणि नारायणे राणे यांनी पक्ष बदलला तेव्हा राज्यात आणि देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार होतं. दोन्ही नेते सत्तेच्या आश्रयाला गेले. मात्र 2014 नंतर देशातील राजकीय परिस्थिती मोठा बदल झाला. त्यानंतर आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपात छगन भुजबळ यांना तुरुंगातही जावं लागलं. तर नारायण राणे यांनी काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वावर नाराज होत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत वेगळी चूल मांडली.

शिवसेनेला आव्हान देऊन बाहेर पडलेल्या या दोन नेत्यांतील एकजण पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरा भाजपच्या गोटात दाखल होणार आहे. छगन भुजबळ यांनी अद्याप आपल्या शिवसेना प्रवेशाबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र ते लवकरच पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा हाती घेतील अशी माहिती आहे.

दुसरीकडे, नारायण राणे यांनी मात्र भाजप प्रवेशाबाबत खुलासा केला आहे. मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलनाला राणे यांनी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाची तारीख जाहीर केली. येत्या 1 सप्टेंबरला तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, त्यात किती तथ्य आहे? असा प्रश्न नारायण राणेंना विचारण्यात आला. त्यावर ही चर्चा खरी असल्याचं नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे.

Loading...

छगन भुजबळ आणि नारायण राणे या दोन नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्ताधाऱ्यांच्या या खेळीला कसं प्रत्युत्तर दिलं जाणार हे पाहावं लागेल.

SPECIAL REPORT : भुजबळांची घरवापसी होण्याआधी 'मातोश्री' नेमकं काय घडलं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 09:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...