शेवटच्या क्षणी गेम पलटला, दिल्लीतून गणेश नाईकांना मोठा धक्का!

नवी मुंबईच्या बेलापूर मतदार संघातून गणेश नाईक यांना मोठा धक्का बसला आहे.

सागर कुलकर्णी सागर कुलकर्णी | News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2019 01:29 PM IST

शेवटच्या क्षणी गेम पलटला, दिल्लीतून गणेश नाईकांना मोठा धक्का!

नवी मुंबई, 01 ऑक्टोबर : भाजपने विधानसभेसाठी पहिल्या 125 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये गणेश नाईक यांना मोठा धक्का बसला आहे. सगळ्यात जास्त कार्यकर्ते आणि कुटुंबासह भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गणेश नाईक यांना तिकीट मिळण्याची शक्यता असताना दिल्लीतून जाहीर केलेल्या यादीत त्यांच्या जागी मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बेलापूर मतदार संघातून आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्याता आली आहे. खरंतर तिकीट मिळण्याची शक्यता कमी वाटत असल्यामुळे मंदा म्हात्रे या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. पण अगदी शेवटच्या क्षणी गेम चेंज होत मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

युतीच्या फॉर्मुल्यानुसार, नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदार संघ भाजपला देण्यात आले आहेत. यानुसार ऐरोली मतदार संघातून गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बेलापूर मतदार संघातून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. ऐरोली आणि बेलापूर दोन्ही मतदार संघ भाजपला देण्यास मातोश्री सकारात्मक होती. गणेश नाईक यांनी आपल्या कुटुंबातल्या इतर सदस्यांसह राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं होतं.

इतर बातम्या - चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीवर भाजपात धुसपूस, धक्का देण्यासाठी विरोधकांचा प्लान

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर या पहिल्या यादीमध्ये विद्यमान 12 उमेदवारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. दरम्यान, नागपूर पश्चिम- देवेंद्र फडणवीस, कोथरूड- चंद्रकांत पाटील, सातारा- शिवेंद्रराजे, कसबा- मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने विधानसभेच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने रविवारी 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे आता भाजप कोणत्या उमेदवारांना रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने 90 टक्के उमेदवारांची नावं निश्चित केली असल्याची माहिती आहे.

Loading...

इतर बातम्यान - मुख्यमंत्री फडणवीस यांना SCकडून धक्का; ऐन विधानसभा निवडणुकीत दाखल होणार खटला!

इतर बातम्या - ट्रकची सायकलला भीषण धडक, डोक्यावरून चाक गेल्यामुळे विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 12:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...