मनसेला धक्का, नेत्याला भाजपने जाहीर केली उमेदवारी

मनसेला धक्का, नेत्याला भाजपने जाहीर केली उमेदवारी

भाजपने विद्यमान आमदारांसह काही मंत्र्यांचंही तिकीट कापलं आहे.

  • Share this:

नाशिक, 4 ऑक्टोबर : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर केली आहे. यावेळी भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केल्याचं पाहायला मिळत आहे. कारण भाजपने विद्यमान आमदारांसह काही मंत्र्यांचंही तिकीट कापलं आहे. तर नाशिक पूर्वमधून मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मनसेला धक्का बसला आहे.

राहुल ढिकले हे माजी खासदार उत्तमराव ढिकले यांचे पुत्र आहेत. ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रवेशानंतर राहुल ढिकले हे नाशिक पूर्वमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. ऐन निवडणुकीत प्रदेश उपाध्यक्षाने पक्ष सोडल्याने नाशिकमध्ये मनसेची डोकेदुखी वाढली आहे.

खडसेंसह तावडेंचा पत्ता कट

मुक्ताईनगर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं तिकीट कापत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. तिकीट कापलं जाणं हा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपने चौथ्या यादीत सात जागांची घोषणा केली आहे. यामध्येही एकनाथ खडसे यांच्यासह विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांना स्थान देण्यात आलेलं नाही. तर कुलाबामधून रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे.

भाजपची चौथी यादी, कुणाला मिळाली संधी?

मुक्ताईनगर - रोहिणी खडसे

काटोल - चरणसिंह ठाकूर

तुमसर - प्रदीप पडोले

नाशिक (पूर्व)- राहुल ढिकले

बोरिवली - सुनील राणे

घाटकोपर (पूर्वी) - पराग शाह

कुलाबा - राहुल नार्वेकर

VIDEO: प्रशासनाच्या भोंगळ कारभार; कंबरेएवढ्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ

First Published: Oct 4, 2019 10:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading