'ना'राजीनामा नाट्य! शिवसेनेच्या 350 पदाधिकारी, 36 नगरसेवकांचा केला जय महाराष्ट्र, बंडखोराला जाहीर पाठिंबा

'ना'राजीनामा नाट्य! शिवसेनेच्या 350 पदाधिकारी, 36 नगरसेवकांचा केला जय महाराष्ट्र, बंडखोराला जाहीर पाठिंबा

आता कल्याणनंतर नाशिकमधलीही शिवसेना-भाजपची युती फिसकटल्याचं दिसत आहे.

  • Share this:

नाशिक, 15 ऑक्टोबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात बंडखोरी शमवण्यासाठी प्रयत्न करूनही, ते अपयशीच ठरले असंच म्हणावं लागेल. कारण आता कल्याणनंतर नाशिकमधलीही युती फिसकटली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघाची जागा भाजपला देण्यात आल्यानं शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त थेट बंडखोरीचंच हत्यार उपसलं. भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या विरोधात उभे ठाकलेले शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदे यांचा प्रचार शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी उघडपणे करत आहेत. यानंतर मंगळवारी (15 ऑक्टोबर) जवळपास 350 पदाधिकारी आणि 36 नगरसेवकांनी विलास शिंदे यांनी जाहीर समर्थन दर्शवत सामूहिक राजीनामे दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच नाशिक पश्चिम मतदारसंघात युतीत फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील कलह वाढत आहे.

(वाचा : महायुतीत फूट, निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारासह 28 नेत्यांचा राजीनामा)

यापूर्वी कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातही महायुतीत फूट पडली. शिवसेना बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्यासह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील 18 नगरसेवक आणि उल्हासनगरमधील 10 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. आमच्यामुळे पक्ष अडचणीत येऊ नये, अशी राजीनामा दिलेल्या नगरसेवकांचं म्हणणं होतं. दरम्यान, कल्याण पूर्वमध्ये भाजपचे गणपत गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. कल्याण पूर्व मतदार संघ भाजपला सोडल्याने शिवसेनेचे स्थानिक नगरसेवकांसह पदाधिकारी नाराज झाले होते. या मतदार संघातून उल्हासनगर महापालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते धनंजय बोडारे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

(वाचा : भाजपचा संकल्प, सावरकरांना भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करणार)

2014 मध्ये एकला चलो रे..

शिवसेनेने 2014 च्या निवडणुकीत एकला चलो रे..चा भूमिका स्वीकारली होती. अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले गणपण गायकवाड यांनी 777 मतांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. या निवडणुकीत मात्र गणपत गायकवाड यांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिली आहे. यामुळे शिवसेनेचे नगरसेवकांसह पदाधिकारी नाराज झाले आहेत.

(वाचा : अजित पवारांसोबत प्रचार केल्यानंतर राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा भाजपप्रवेश)

जे सुडाचं राजकारण करतील त्यांना चिरडून टाकू- उद्धव ठाकरे

'विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा झाला. त्यासाठी मुंबईत शिवाजी पार्कवर जय्यत तयारीही करण्यात आली होती. राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक या दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर जमले होते. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. जोपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी यांच धोरण बदलत नाही तोपर्यंत तेच माझ्य टार्गेटवर राहतील असंही ते म्हणाले. भाजपला पाठिंबा देण्याशीवाय दुसरा काय पर्याय होता. 370 कलमाचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला समर्थन द्यायचं काय असा सवालही त्यांनी केला. उद्धव ठाकरे म्हणाले, विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजा करायची असते, माझी शस्त्र ही माझ्या समोर महाराष्ट्रभर पसरलेली आहेत आणि तुमच्या सगळ्यांचं पूजन करून मी याच महिन्यात असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकवायला निघालो आहे. आजही आम्ही ठाम आहोत, विशेष कायदा करा आणि अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा ही आजही शिवसेनेची मागणी आहे असंही ते म्हणाले.

VIDEO : मुंबई काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आडमुठेपणा कायम; राहुल गांधींच्या सभेत नाराजीनाट्य

First published: October 15, 2019, 1:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading