विधानसभेला शिवसेनेविरुद्ध रणसंग्राम, नारायणे राणे कुडाळमधूनच लढणार

नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

  • Share this:
    सिंधुदुर्ग, 20 जुलै : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोकणात चांगलाच राजकीय धुरळा उडणार आहे. 'मालवण-कुडाळ मतदारसंघातूनच राणे विधानसभा निवडणूक लढवतील. तुम्ही त्यांना साथ द्या,' अषा आशयाचं विधान नितेश राणे यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. त्यामुळे कुडाळ मतदारसंघात पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेनेचे वैभव नाईक अशी लढत रंगणार आहे. दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्या कोकणातील राजकीय वर्चस्वाला सुरुंग लागला. कारण कुडाळमधून वैभव नाईक यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राणे पराभवाचा वचपा काढणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नारायण राणे आणि राजकीय वर्चस्वाचा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती सतत चर्चेत असतात. नारायण राणे हे त्यातलंच एक नाव. पण सध्या नारायण राणेंची राजकीय अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वैभव नाईक हे जाएंट किलर ठरले होते. त्यांनी थेट नारायण राणेंना पराभवाची चव चाखायला लावली होती. त्यामुळे राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे, असं बोललं जाऊ लागलं. राज्यातील राजकारणात राणेंना दोन मोठे धक्के कोकणातील राजकारणाची पकड सैल झाल्याने स्वाभाविकच राणेंच्या राज्यातील राजकारणावरही मोठा परिणाम झाला. काँग्रेस नेतृत्वाकडून त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं आणि राणेंनी काँग्रेस सोडली. पण राणेंसाठी हा शेवटचा धक्का नव्हता. काँग्रेसला रामराम केल्यानंतर मधल्या काळात राणेंनी भाजपमध्ये जाण्यासाठीही जोरदार प्रयत्न केले. पण भाजपमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा भाजपप्रवेशही होऊ शकला नाही. त्यामुळे राणेंची चांगलीच अडचण झाली. शिवसेना युतीत येताच राणे भाजपपासून दूर मधल्या काळात शिवसेना सतत सत्तेविरोधात भूमिका घेत होती. अशातच भाजपनं कोकणात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी राणेंना जवळ केलं. पण नंतर मात्र लोकसभेसाठी शिवसेनेसोबत युती झाली. त्यामुळे भाजपकडून राज्यसभेवर गेलेले नारायण राणे यांनी भाजपवरच टीकास्त्र सोडलं. राजकीय कमबॅकसाठी विजय आवश्यक कोकण आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणणं राणेंसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राज्यातील सत्तेत काही वाटा मिळवायचा असल्यास स्वबळावर काही आमदार निवडून आणणं राणेंसाठी क्रमप्राप्त ठरणार आहे. VIDEO: 'गर्दी झाली म्हणून पाहायला गेलो अन् समोर भाऊच रक्ताच्या थारोळ्यात होता'
    First published: