महाराष्ट्राचा महासंग्राम : बोरिवलीमध्ये विनोद तावडेंचं वर्चस्व कायम राहणार का?

महाराष्ट्राचा महासंग्राम : बोरिवलीमध्ये विनोद तावडेंचं वर्चस्व कायम राहणार का?

बोरिवली मतदारसंघावर गेली 20 वर्षं भाजपचं वर्चस्व आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे या मतदारसंघात भरघोस मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे याहीवेळी त्यांचीच उमेदवारी इथून निश्चित मानली जातेय.

  • Share this:

बोरिवली, 10 सप्टेंबर : बोरिवली मतदारसंघावर गेली 20 वर्षं भाजपचं वर्चस्व आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे या मतदारसंघात भरघोस मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे याहीवेळी त्यांचीच उमेदवारी इथून निश्चित मानली जातेय.

युतीकडून विनोद तावडेंचं नाव निश्चित असलं तरी विनोद तावडे यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेस विशेष रणनीती आखेल, अशी शक्यता आहे. विनोद तावडे हे बोरिववलीमध्ये राहत नाहीत. ते विलेपार्लेमध्ये राहतात. 2014 च्या निवडणुकीत त्यांच्याविरोधात भाजपचे काही स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात नाराजीचा सूर होता. पण विनोद तावडेंचा प्रभाव आणि भाजपचं वर्चस्व असल्याने त्यांचा विजय झाला.

या निवडणुकीत मनसेचे उमेदवार असलेले आणि याआधी 2014 ची निवडणूक लढवलेले नयन कदम हेही उभं राहण्यासाठी इच्छुक आहेत. विनोद तावडेंसमोर काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी आणि कुमार खिल्लारे यांनी उमेदवारी मागितली आहे. त्यांच्याऐवजी नवीन उमेदवाराला सुद्धा संधी मिळू शकेल, अशी चर्चा आहे.

शिवानंद शेट्टी हे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. शिवाय मराठी सोडून त्यांना इतर मतंही मिळू शकतात. मनसे आघाडीत सामील झाली तर त्यांना मराठी मतंसुद्धा मिळू शकतील. त्यामुळे विनोद तावडे यांना मागच्या निवडणुकीपेक्षा काही प्रमाणात तगडं आव्हान मिळू शकतं.

बोरिवली मतदारसंघ हा मराठी आणि गुजरातीभाषक मतदारांचा आहे. त्यामुळे मराठी आणि गुजराती मतदारांवरच इथली समीकरणं अवलंबून आहेत. यावर्षी जर मनसे आघाडीत सामील झाली तर मराठी मतांचं विभाजन होऊ शकतं. त्यामुळे आघाडीच्या समीकरणांकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

1. विनोद तावडे, भाजप -1 लाख 8 हजार 278

2. उत्तमप्रकाश अगरवाल, शिवसेना - 29 हजार 11

3. नयन कदम, मनसे - 21 हजार 765

===================================================================================================

VIDEO :...ही तर दादागिरी, 'आरे'वरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 09:00 PM IST

ताज्या बातम्या