विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट, 'या' जिल्ह्यातून लढणार सर्वाधिक उमेदवार

छाननीअंती 4 हजार 743 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते.

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2019 08:46 AM IST

विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट, 'या' जिल्ह्यातून लढणार सर्वाधिक उमेदवार

मुंबई, 8 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात 288 मतदारसंघात 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे आता एकूण 3 हजार 239 उमेदवार निवडणूक रिेंगणात आहेत. छाननीअंती 4 हजार 743 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातून 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले.

सर्वात जास्त 246 उमेदवार पुणे जिल्ह्यातून तर सर्वात कमी 23 उमेदवार सिंधुदूर्ग जिल्ह्यातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. नांदेड दक्षिण हा सर्वाधिक उमेदवार असणारा मतदारसंघ ठरला आहे तर सर्वात कमी उमेदवार चिपळूण मतदारसंघात आहेत. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नांदेड दक्षिण, बीड, औरंगाबाद पूर्व, जालना या चार मतदारसंघात 31 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने एका ईव्हीएमसाठी 3 बॅलेट युनिटची (बीयु) आवश्यकता राहणार असून कंट्रोल युनिट (सीयु) एकच लागणार आहे.

मतपत्रिकेवर (बॅलेटपेपर) मतदान घ्यावे लागणार नाही

अकोट, रिसोड, धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, साकोली, गोंदिया, गडचिरोली, वणी, नांदेड उत्तर, वैजापूर, नाशिक पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, उल्हासनगर, बेलापूर, पिंपरी, पुणे कॅन्टोन्मेंट, नेवासा, गेवराई, माजलगाव, परळी, लातूर शहर, तुळजापूर, सोलापूर शहर मध्य, पंढरपूर, सांगोला, हातकणंगले अशा 30 मतदारसंघांमध्ये 15 पेक्षा अधिक उमेदवार असल्याने दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघात सर्वाधिक 91 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यामधून अर्जमाघारीनंतर केवळ 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्यात ईव्हीएमच्या अत्युच्च उमेदवारसंख्येच्या मर्यादेपेक्षा कमी उमेदवारांची संख्या असल्याने कुठेही मतपत्रिकेवर (बॅलेटपेपर) मतदान घ्यावे लागणार नाही.

कारवाईचा धडाका

Loading...

आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात 11 कोटी 39 लाख रुपयांची रोकड, 12 कोटी 47 लाख रुपयांची दारु, 15 कोटी 29 लाख रुपये किमतीचे मादक पदार्थ आणि 8 कोटी 87 लाख रुपये किमतीचे सोने, चांदी व अन्य मौलवान दागिणे असा सुमारे 48 कोटी 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्यात विविध कलमांखाली 442 प्रकरणांमध्ये कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये भा.दं.वि.अंतर्गत विविध कलमांखाली 102, लोक प्रतिनिधीत्व अधिनियमाखाली 15, अंमली पदार्थ विषयक एनपीडीएस अधिनियमांतर्गत 72, मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत 228 तर मालमत्तेचे विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत 25 प्रकरणांचा समावेश आहे, अशीही माहिती श्री. शिंदे यांनी दिली.

युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2019 08:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...