सरसंघचालक मोहन भागवत आणि अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

मोहन भागवत यांनी नागपूरमधल्या मतदान केंद्रावर तर अजित पवार यांनी काटेवाडी इथल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाला हक्क बजावला.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 07:31 AM IST

सरसंघचालक मोहन भागवत आणि अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई 21 ऑक्टोंबर : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत आणि राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात पहिले मतदान केलं. मोहन भागवत यांनी नागपूरमधल्या मतदान केंद्रावर तर अजित पवार यांनी काटेवाडी इथल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाला हक्क बजावला. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांनीही मतदान केलं. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर गडचिरोलीसारख्या संवेदनशील मतदान केंद्रांवर दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान पार पडेल. मतदानकेंद्रांवर मोठी लगबग सुरु असून जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दिव्यांगांसाठी विशेष सोय करण्यात आलीय. दरम्यान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव दल, गुजरात राज्य राखीव दलाचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुर्गम भागासाठी वायरलेस सेट तसेच संवेदनशील केंद्राच्या टेहाळणीसाठी ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे. या शिवाय गुगल मॅपमध्ये सर्व मतदान केंद्रे टॅग केल्याने मतदान केंद्र नेमके कुठे आहे, किती जवळ किंवा लांब आहे हे मतदारांना घर बसल्या समजणार आहे.

किती आहेत मतदार ?

मतदार- 8 कोटी 98 लाख 39 हजार 600

मतदानकेंद्र- 96 हजार 661

Loading...

मतदान यंत्र-1 लाख 79 हजार 895

खास महिलांसाठी -352 सखी मतदार केंद्र

6 लाख 50 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

कोण किती जागा लढवतेय?

एकूण जागा - 288

........................

भाजप - 164

शिवसेना - 124

काँग्रेस - 147

राष्ट्रवादी - 121

सपा - 7

स्वाभिमानी शेतकरी संघटना - 5

वंचित बहुजन आघाडी - 235

एम.आय.एम. - 44

बहुजन विकास आघाडी - 31

मनसे - 105

बसपा - 262

आप - 24

मनसे 105 पैकी शिवसेने विरोधात 54 तर भाजप च्या विरोधात 51 जागा लढवत आहे

भाजप 164 पैकी राष्ट्रवादीच्या विरोधात 60, काँग्रेसच्या विरोधात 94, अन्य विरोधात 10 जागा लढवत आहे

शिवसेना 126 पैकी राष्ट्रवादीच्या विरोधात 57, काँग्रेसच्या विरोधात 52 तर अन्य विरोधात 15 जागा लढवत आहे,

शिवसेना-भाजप राज्यात कणकवलीत एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 07:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...