EXIT POLL : 'राज की बात' मनसेचं इंजिन किती धावणार?

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल तर काँग्रेस राष्ट्रवादीचा पुन्हा धुव्वा उडेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 12:48 PM IST

EXIT POLL : 'राज की बात' मनसेचं इंजिन किती धावणार?

मुंबई, 21 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदार संघातील हजारो उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत आज बंद झाले. याचा निकाल गुरुवारी 24 ऑक्टोबरला लागणार आहे. राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 55.35 टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारीत घट झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेवर कोणाचा झेंडा फडकणार, कोण बाज मारणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पुन्हा धुव्वा उडणार असंच दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्यात कुठेही आघाडीला दुहेरी आकडा गाठणं कठीण जाईल असं एक्झिट पोलचा अंदाज सांगतो.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर सभा घेतल्या होत्या. त्यानंतर विधानसभा निवडणूकही लढवणार असल्याचं अखेरच्या क्षणी सांगितलं होतं. सभांना होणारी गर्दी पुन्हा एकदा मतदानात परावर्तित होत नसल्याचंच एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. मनसेला राज्यात एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.

मतदानपूर्वी सर्वेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत शून्य जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता.  2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवताना मनसेनं 13 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 2014 मध्ये केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. आता एकही जागा जिंकणार नाही असा अंदाज पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

वाचा : उत्तर महाराष्ट्रात 36 पैकी 31 जागांवर भाजप-शिवसेना महायुतीची 'आघाडी'

Loading...

2014 च्या निवडणुकीत काय झालं?

2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

वाचा : विदर्भात महायुतीचंच वर्चस्व, News 18 लोकमत आणि IPSOS च्या सर्व्हेचा अंदाज

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

LIVE EXIT POLL : केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र; महाराष्ट्रात युती ऐतिहासिक

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा आणि 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

घोड्यावर बसून तरुण आले मतदानाला, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 07:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...