मनसेचं ठरलं... मराठवाड्यातील 46 जागांपैकी एवढ्या जागावर लढणार

मनसेचं ठरलं... मराठवाड्यातील 46 जागांपैकी एवढ्या जागावर लढणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम,(प्रतिनिधी)

औरंगाबाद,23 सप्टेंबर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मनसेच्या ज्येष्ठ नेत्यांची गेल्या आठवड्यात मुंबईत बैठक झाली. त्यात राज्यभरातील जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्ष उपस्थित होते. विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

मराठवाड्यात मनसे निवडणूक लढवणार आहे, हे आता निश्चित झाले आहे. मराठवाड्यातील किती जागा लढवायच्या याबाबत मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. मराठवाड्यातील 46 जागांपैकी 32 जागा लढवण्यासाठीचा प्रस्ताव मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमोर ठेवला जाणार असल्याचे सुमित खांबेकर यांनी सांगितले. राज्यातील जिल्हा प्रमुखांची बैठक मंगळवारी मुंबईत होणार आहे. या बैठकी मध्येच राज्यातील कोणत्या भागात किती जागा लढवल्या जाणार हेही जाहीर होण्याची शक्यता आहे.

नाशिक मध्ये लढणार 15 पैकी 15 जागा

विधानसभा निवडणुकीत मनसे नाशिकमध्ये 15 पैकी 15 जागा लढणार असल्याची माहिती मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी दिली आहे. अभिजीत पानसे आणि संदीप देशपांडे यांच्या उपस्तीतीत नाशिकमध्ये मनसे कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांच्या बैठक पार पडली. या बैठकीला नाशिकच्या 15 विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी सर्वच्या सर्व जागा लढण्याचा आग्रह धरला असून या सर्व जागा वर उमेदवार दिले जातील, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

काय म्हणाले बाळा नांदगांवकर..

मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी सांगितले की,पक्षाने विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत राज ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असे नांदगावकरांनी सांगितले आहे. मनसे बहुतांश जागांवर उमेदवार देण्याची शक्यता आहे.

स्मिता गोंदकरने दिली ग्रॅण्ड पार्टी! सेलिब्रिटींची फुल टू धमाल! पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 04:46 PM IST

ताज्या बातम्या