मुंबई, 29 जुलै : आगामी विधानसभा निवडणुकीतही राज्यातील सत्तेच्या चाव्या आपल्याकडेच ठेवण्यासाठी शिवसेना आणि भाजपनं चांगलाच मास्टर प्लान आखला आहे. या प्लाननुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी-काँग्रेसमधील मोठ-मोठे नेते गळाला लावण्याचा काम सध्या सुरू आहे. यावरून 'तोडा, फोडा आणि राज्य करा' या धोरणानुसार विरोधकांना कमकुवत करण्याचे जोरदार प्रयत्न शिवसेना-भाजपकडून होत असल्याचे राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. यादरम्यानच एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. एकीकडे राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आउटगोईंग सुरू असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे यावेळेस माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे जयंत पाटील, तसंच माजी खासदार राजू शेट्टी देखील तिथे उपस्थित होते. छोटे पक्षांनी एकत्र येऊन आगामी निवडणूक लढवावी का? याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
(पाहा : VIDEO: विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांनी 'ही' दिली ऑफर)
सोमवारी (29 जुलै) राज ठाकरे यांनी जयंत पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दरम्यान, या भेटीमागील कारण अद्याप गुदस्त्यातच आहे. अलीकडच्या काळात राष्ट्रवादीतून आउटगोईंग वाढल्याने ही भेट म्हणजे नव्या समीकरणाची नांदी असावी, अशी चर्चा राजकीय गोटात सुरू झाली आहे.
(पाहा :VIDEO: येडियुरप्पा अग्निपरीक्षेत पास, आवाजी मतदानानं जिंकला विश्वासदर्शक ठराव)
तर दुसरीकडे, येत्या 9 ऑगस्ट रोजी विरोधक ईव्हीएमविरोधात आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, 8 जुलै रोजी राज यांनी दिल्लीत जाऊन ईव्हीएमसंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपर आणा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती.
राज भेटीनंतर जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीला
राज ठाकरेंसोबत बैठक झाल्यानंतर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईत सिल्व्हर ओक येथे ही भेट झाली. राज ठाकरे भेटीदरम्यान झालेल्या चर्चेचा तपशील तसंच मुंबई अध्यक्ष या विषयावर शरद पवारांसोबत विचारविनिमय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
(पाहा :VIDEO: पालिका आणखी किती बळी घेणार? मॅनहोलमध्ये पडून 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू)
दरम्यान, यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही मुंबईत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली आहे. पण ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातं आहे.
राज ठाकरेंचा तीन दिवसीय कोलकाता दौरा
राज ठाकरे मंगळवारी कोलकात्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येथे त्यांचा तीन दिवसांचा मुक्काम असेल. बुधवारी (31 जुलै)राज ठाकरे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. EVMचा विरोध आणि हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर मोठे आंदोलन उभे करणे या भेटीमागचा उद्देश आहे.
ममता बनर्जी यांच्याप्रमाणे आणखी काही प्रमुख राजकीय नेत्यांनाही ते भेटणार आहेत.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भूकंप; पवारांच्या जवळचाच नेता करणार भाजपात प्रवेश?