सातारा, 15 जुलै : विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. आघाडी आणि युतीस छोट्या पक्षांनीही निवडणुकीत निर्णायक भूमिका मिळवण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
'विधानसभा निवडणुकीत प्रहारचे कमीत कमी पाच आमदार निवडून आणण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी ज्या लोकांना आमचे विचार पटत असलतील त्यांच्यासोबत आम्ही जाण्यास तयार आहोत,' असं म्हणत बच्चू कडू यांनी आगामी निवडणुकीत एकला चलो रे ही भूमिका न घेता मोठ्या राजकीय पक्षाबरोबर आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत.
काँग्रेसचीही जोरदार तयारी
काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. या भेटीत महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकारणीत फेरबदल करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभवातून काँग्रेसने चांगलाच धडा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल करण्यात आला. त्यामुळे आता इतरही पदांवर तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आता काँग्रेसमध्ये नक्की कोणते बदल करण्यात येणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
VIDEO: फडणवीस सरकारमधल्या मंत्र्यांनंच केलं निवडणुकींच्या तारखांचं भाकीत