Maharashtra Election Result 2019 LIVE: आबांचं कुटुंब जिंकलं आणि 'वहिनीसाहेब'ही जिंकल्या!

Maharashtra Election Result 2019 LIVE: आबांचं कुटुंब जिंकलं आणि 'वहिनीसाहेब'ही जिंकल्या!

सुमनताई आर.आर. पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यात काट्याची लढत होती.

  • Share this:

तासगाव, 24 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला आहे.

सुमनताई पाटील यांनी 50 हजाराहुन अधिक मतांनी विजय मिळवला आहे. कवठेमहांकाळ या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुमनताई आर आर पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यात काट्याची लढत होती.

विशेष म्हणजे, या मतदारसंघात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि दोन्ही ही मराठा उमेदवार आहेत. पाणी आणि दुष्काळ या मुद्यावर येथील निवडणूक पार पडली. सुमनताई पाटील यांना आर.आर. पाटील यांच्या वारसा आहे तर अजितराव घोरपडे हे माजी मंत्री आहेत.परंतु, यंदाही तासगावकरांनी सुमनताई यांना पसंती देत विजयी केलं आहे. मागील निवडणुकीतही सुमनताई यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला होता.

प्रचारात आबांचा मुलगा रोहितची छाप

आर.आर. पाटील यांचा मुलगा रोहितनं राजकारणात पाऊल टाकलं आहे. आबांच्या पावलावर पाऊल टाकत रोहितनं आश्वासक वाटचाल सुरू केली आहे. आबा सहजपणे कार्यकर्त्यांमध्ये मिसळून जायचे. आईचा निवडणुकीचा प्रचार करताना रोहितमध्ये आबांची झलक पाहायला मिळाली.

रोहितची बहिण स्मिताही राजकारणात होती. राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं अध्यक्षपद स्मितानं भूषवलं होतं. मात्र, लग्नानंतर स्मिता राजकीय पटलावरून बाजूला गेली. तर रोहितला कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतलं. दुसरीकडे रोहित प्रसार माध्यमांसोबत आत्मविश्वासानं बोलताना दिसला. रोहितचा आबांसारखा हा आत्मविश्वास पाहून त्यांची आई सुमनताई पाटील गहिवरून गेल्या होत्या. अखेर पाटील कुटुंबाची मेहनत फळाला आली असून सुमनताई यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

=======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 01:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading