SPECIAL REPORT : शरद पवार पैलवान नाही ठरले वस्ताद, फडणवीसांना दाखवले 'आस्मान'!

विधानसभेच्या आखाड्यात भलेही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचं मैदान मारण्यात यश आलं नसेल, पण अनेकांची मनं जिंकत पवार बाजीगर ठरलेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 08:33 PM IST

SPECIAL REPORT : शरद पवार पैलवान नाही ठरले वस्ताद, फडणवीसांना दाखवले 'आस्मान'!

मुंबई, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा वारू रोखण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकहाती केलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दिलेली झुंज अनेकांची मनं जिंकणारी ठरली. ७९ व्या वर्षी मोठ्या जिद्दीनं लढणाऱ्या या लढवय्यानं दाखवून दिलंय राजकीय कुस्तीच्या आखाड्यातले तेच खरे वस्ताद आहेत.

विधानसभेच्या आखाड्यात भलेही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचं मैदान मारण्यात यश आलं नसेल, पण अनेकांची मनं जिंकत पवार पराभूत होऊनही बाजीगर ठरलेत.

लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर भाजपनं राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याची एकही संधी सोडली. उदयनराजे भोसले, गणेश नाईक, मधुकर पिचड, राणा जगजित सिंग, विजयसिंह मोहिते पाटील असे शरद पवारांचे अनेक शिलेदार कसोटीच्या काळात मैदान सोडून भाजपमध्ये सामील झाले. त्यात ईडीची पिडा आली. पण मैदान सोडतील ते पवार कसले. समोरून शक्तीशाली भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना ललकारताच 79 वर्षांच्या शरद पवारांनी आव्हान स्विकारलं.

शरीर आणि वयाच्या मर्यादांना न जुमानता शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला. रन मैदानात उतरलेल्या शरद पवारांनी उन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता भाजपचं एकहाती आव्हान पेललं. तेव्हाच पवारांनी साताऱ्याचं मैदान आणि महाराष्ट्राची मनं जिंकली होती.

Loading...

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही पवार रणांगणात कणखर पहाडासारखे पाय रोवून उभं राहिले. त्यांनीच भाजपचा वारू रोखून धरला. पवार हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनांचं नेतृत्व केलेले राजकीय खेळपट्टीवरचे कसलेले खेळाडू आहेत. वनडे क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत जिंकण्याचा रोमांच आणि थरार कसा असतो हे पवारांनी राजकीय मैदानात दाखवून दिलं. अनेक वादळं पचवलेली पवार नावाची पावर अजून संपलेली नाही हे त्यांनी दाखवून दिलं.

==============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 08:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...