Election Result 2019 : चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या काकाला पुतण्याने दाखवले आस्मान!

विशेष म्हणजे, जयदत्त क्षीरसागर यांनी हातावरचे घड्याळ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. सेनेकडून त्यांना मंत्रिपदही देण्यात आले होते.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 08:35 PM IST

Election Result 2019 : चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या काकाला पुतण्याने दाखवले आस्मान!

बीड, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील बहुचर्चित काका-पुतण्यांच्या लढतींमध्ये पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी बाजी मारत काका जयदत्त क्षीरसागर यांची धोबीपछाड केली आहे.

शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा दारुण पराभव झाला आहे. अटीतटीच्या लढती मुळे शेवटच्या क्षणापर्यंत कोणाच्या पारड्यात यश पडेल याची उत्सुकता ताणली होती. अखेर संदीप क्षीरसागर यांनी 1786 मतांची आघाडी घेवून दणदणीत विजय मिळवला.

विजयानंतर संदीप क्षीरसागर यांनी हा पक्ष निष्ठेचा विजय आहे, असं सांगितलं. त्याबरोबरच धन शक्ती विरुद्ध जनशक्तीचा आशीर्वाद जिंकला असल्याचंही क्षीरसागर म्हणाले.

विशेष म्हणजे, जयदत्त क्षीरसागर यांनी हातावरचे घड्याळ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. सेनेकडून त्यांना मंत्रिपदही देण्यात आले होते. क्षीरसागर यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीकडून त्यांच्याच पुतण्याला तिकीट देण्यात आलं होतं.

Loading...

प्रचारात काका-पुतण्यामध्ये चांगलाच सामना रंगला होता. जयदत्त यांनी आपल्या पुतण्याच्या चारित्र्यावरच शितोंडे उडवले होते. त्यानंतर पुतण्यानेही दंड थोपाटत त्यांनी माझ्यावरील चारित्र्यचे आरोप सिद्ध करावे. मी निवडणुकीतून विड्रोल करतो, असं जाहीर आव्हानचं संदीप यांनी दिलं होतं. विशेष म्हणजे, जयदत्त यांच्या चारित्र्याबाबत आपल्याकडे मोठा पुरावा आहे. तो फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासा किंवा कुठेही तपासा तो 100 टक्के खरा आहे. फक्त तो काढायला लावू नका, असा धमकी वजा इशाराही संदीप यांनी भरसभेत दिला होता.

अखेर बीडमध्ये भाऊ आणि बहिणीच्या सामन्यानंतर काका पुतण्याच्या लढाईत पुतण्याने बाजी मारली आहे.

===========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 07:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...