रोहित पवारांचा राजकारणातला सुसंस्कृतपणा दाखवणारा हा VIDEO

राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी आज मतमोजणीत आघाडी घेतली आणि अखेर ती विजयात रुपांतरीत झाली.

News18 Lokmat | Updated On: Oct 25, 2019 09:50 AM IST

रोहित पवारांचा राजकारणातला सुसंस्कृतपणा दाखवणारा हा VIDEO

कर्जत, 24 ऑक्टोबर: कर्जत जामखेडमधील भाजपचे पराभूत मंञी राम शिंदे यांनी विजयी उमेदवार रोहित पवार यांचा फेटा बांधून सत्कार केला. महाराष्ट्राच्या राजकारणातील आगळावेगळा क्षण पाहण्यास मिळाला. रोहित यांनी राम शिंदेंच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी रोहित यांनी राम शिंदे यांच्या आईचे आशीर्वाद घेऊन राजकारणातील सुसंस्कृतपणा दाखवून दिला.

दरम्यान, राज्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी आज मतमोजणीत आघाडी घेतली आणि अखेर ती विजयात रुपांतरीत झाली. रोहित पवार यांचा सामना थेट भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्याविरोधात होता. त्यामुळे रोहित काय करिष्मा करून दाखवतील याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर, आज निकालाअंती रोहित यांना 135824 मतं मिळाली. तर राम शिंदे यांना 92477 मतं मिळाली. रोहित यांनी विजय मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

दरम्यान, जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांची मिरवणूक आणि जल्लोष हा जनतेचा विजय असून येणाऱ्या काळामध्ये या भागातील प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देण्यात येईल महाराष्ट्रात आकडेवारी कमी असली तरी शेवटी शरद पवार पुढील निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.

=================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 08:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...