Result 2019: जळगावात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, पाहा निकालाचे LIVE अपडेट

उत्तर महाराष्टात पुन्हा महाआघाडीला धोबीपछाड देत महायुती सत्तेवर येणार की युतीला धक्का देत आघाडी बाजी मारणार..

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 09:41 AM IST

Result 2019: जळगावात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, पाहा निकालाचे LIVE अपडेट

राजेश भागवत/ इम्तियाज अहमद(प्रतिनिधी)

जळगाव/भुसावळ,24 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीचा मतमोजणी सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील 11 मतदार संघासाठी 100 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर या मुक्ताईनगरमधून भाजपच्या तिकिटावर लढत आहे. सर्वाधिक 13 उमेदवार जळगाव शहर मतदार संघात तर सर्वात कमी प्रत्येकी 7 उमेदवार पाचोरा, अमळनेर व मुक्ताईनगर मतदार संघात नशीब आजमावत आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून 54 उमेदवारांनी माघार घेतली होती.

विधानसभा मतदार संघनिहाय निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची संख्या.. (कंसात माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या)

चोपडा-8 (10), रावेर-10 (4), भुसावळ-12 (9), जळगाव शहर-13 (8), जळगाव ग्रामीण-11 (4), अमळनेर-7 (4), एरंडोल-8, (0), चाळीसगाव-8 (5), पाचोरा-7 (0), जामनेर-9 (5), मुक्ताईनगर-7 (5) याप्रमाणे आहे.

Loading...

महत्त्वपूर्ण लढती...

चोपडा- जगदिशचंद्र रमेश वळवी(राष्ट्रवादी) Vs लताबाई चंद्रकांत सोनवणे(शिवसेना)

रावेर- हरी माधव जावळे(भाजप) Vs चौधरी शिरीष मधुकरराव(काँग्रेस)

भुसावळ- जगन देवराम सोनवणे(राष्ट्रवादी) Vs संजय वामन सावकारे(भाजप)

जळगाव शहर- अभिषेक शांताराम पाटील(राष्ट्रवादी) Vs सुरेश दामू भोळे(राजूमामा) (भाजप)

जळगाव ग्रामीण- गुलाबराव रघुनाथ पाटील(शिवसेना) Vs पुष्पा ज्ञानेश्वर महाजन(राष्ट्रवादी)

अमळनेर- अनिल भाईदास पाटील(राष्ट्रवादी) Vs शिरीषदादा हिरालाल चौधरी(भाजप)

एरंडोल- पाटील चिमणराव रुपचंद(शिवसेना) Vs डॉ. सतिश भास्करराव पाटील(राष्ट्रवादी)

चाळीसगाव- देशमुख राजीव अनिल(राष्ट्रवादी) Vs मंगेश रमेश चव्हाण(भाजप)

पाचोरा- किशोर धनसिंग पाटील(शिवसेना) Vs वाघ दिलीप ओंकार(राष्ट्रवादी)

जामनेर- गिरीश दत्तात्रय महाजन(भाजप) Vs संजय भास्करराव गरुड(राष्ट्रवादी)

मुक्ताईनगर-खडसे रोहिणी एकनाथराव(भाजप) Vs चंद्रकांत निंबा पाटील(अपक्ष)

दरम्यान, राज्यातील अनेक दिग्गजांच्या भवितव्य या निकालात फैसला होणार आहे. महाराष्ट्रात पुन्हा महाआघाडीला धोबीपछाड देत महायुती सत्तेवर येणार की युतीला धक्का देत आघाडी बाजी मारणार, याची उत्सुकता लागली आहे.

नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या चार जिल्ह्यांत विधानसभेच्या 36 जागा आहेत. यंदा अगदी एकतर्फी निवडणूक होईल, असे सुरुवातीला वातावरण होते. मात्र, अखेरच्या टप्प्यात चित्र पालटले आणि बहुतांशी ठिकाणी युतीविरुद्ध आघाडी अशी चुरश निर्माण झाली.

अभूतपूर्व बंडखोरीने निवडणुकीत भरला रंग..

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठ्याप्रमाणात 'इनकमिंग' झाले. परिणामी युतीच्या इच्छुकांनी अभूतपूर्व बंडखोरी केल्यामुळे निवडणुकीत चांगलेच रंग भरले. त्यातील अनेक इच्छुकांनी अखेरच्या टप्प्यात काँग्रेस व राष्ट्रवादीकडे मोर्चा वळवला. मात्र, तिथेही त्यांच्या वाट्याला निराशाच पडली. त्यामुळे बंडखोरीला चांगलाच ऊत आला. जिथे सेनेला जागा आहे तिथे भाजपचे आणि जिथे भाजपला जागा आहे तिथे सेनेचे बंडखोर उभे ठाकले. विशेष म्हणजे आपापल्या पक्षातून या बंडखोरांना मित्रपक्षाविरोधात उघड उघड रसद पुरवठा झाला. त्यातून युतीविरुद्ध युती अशी विचित्र आणि अंतर्गत अस्वस्थता वाढवणारी स्थिती बनली.

मंत्र्यांच्या खडाजंगीने वेधले...

गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील या मंत्रिमहोदयांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेप्रसंगी झालेल्या खडाजंगीने सगळ्याचे लक्ष वेधले. अखेरच्या टप्प्यात शरद पवारांच्या झंझावाती प्रचाराने राष्ट्रवादीत जान फुंकली. पवारांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हुरूप वाढवणारा होता खरा, पण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी 'पोल मॅनेजमेंट'मध्ये आघाडीची मंडळी कमी पडल्याचे जाणवले. अखेर येथे युतीचा वरचष्मा राहील, असा अंदाज जवळपास सर्व खासगी वृत्तवाहिन्या आणि मतदानोत्तर चाचण्या करणाऱ्या संस्थांनी वर्तवले आहे.

उत्तर महाराष्ट्रात लक्षवेधी मतदारसंघांत रोहिणी खडसे (मुक्ताईनगर) नव्या वारसदारांसह छगन भुजबळांसारख्या (येवला) दिग्गज नेत्याचाही समावेश आहे. मतदारांनी इथे व्यक्तीला प्राधान्य दिले गेले की पक्षाला हा निकष या मतदारसंघातील लढतींत सर्वाधिक महत्त्वाचा ठरेल.

काय आहे एक्झिट पोलचा अंदाज?

महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदाज EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. News18 Lokmat च्या exit poll मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

उत्तर महाराष्ट्रात 36 पैकी 31 जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विजयी पतका फडकावणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुती- 31, (भाजप-18, शिवसेना-13) , महाआघाडीला-6 (काँग्रेस-5, राष्ट्रवादी-1) जागांवर यश मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, मागील विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती यंदाच्या निवडणुकीत होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससा यंदाही मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र्य लढवली होती. निकाल पाहिले असता शिवसेना 07, भाजप 15, राष्ट्रवादी 05, काँग्रेस 07 तर अपक्ष 02 उमेदवार निवडून आले होते.

छगन भुजबळांचं मॅजिक चालणार..

या पोलनुसार, येवल्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर छगन भुजबळांचं मॅजिक चाललं आहे. छगन भुजबळ आणि येवला मतदारसंघ हे अनेक वर्षांचं समीकरण आहे. पैठणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या येवला - लासलगाव मतदारसंघातून छगन भुजबळ हे सलग तीन वेळा निवडून आले. यावेळी मात्र त्यांच्याच पक्षातले माणिकराव शिंदे यांनी त्यांना उमेदवारीसाठी आव्हान दिले आहे.

News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीनुसार...

2019 विधानसभा निवडणूक

महायुती (भाजप-शिवसेना) - 31

भाजप-18

शिवसेना-13

काँग्रेस-5

राष्ट्रवादी-1

2019 विधानसभा निवडणूक

शिवसेना 07

भाजप 15

एनसीपी 05

काँग्रेस 07

अपक्ष 02

2009 विधानसभा निवडणूक

शिवसेना 07

भाजप 05

एनसीपी 09

काँग्रेस 06

सपा 01

अपक्ष 05

एमएनएस 03

एकूण जागा - 288

LIVE VIDEO : निकालाचा पहिला कल हाती, कोण आहे आघाडीवर?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 09:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...