Maharashtra Election Result 2019 LIVE: देवेंद्र फडणवीसांना धक्का, स्वबळावर सत्ता नाही!

Maharashtra Election Result 2019 LIVE: देवेंद्र फडणवीसांना धक्का, स्वबळावर सत्ता नाही!

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आधी भाजपने 200 पार असा नारा दिला होता. परंतु, मतमोजणीनंतर भाजपच्या दाव्याला सुरुंग लागला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आधी भाजपने 200 पार असा नारा दिला होता. परंतु, मतमोजणीनंतर भाजपच्या दाव्याला सुरुंग लागला आहे. भाजपला 100 च्या आतच समाधान मानावे लागले आहे. धक्कादायक म्हणजे, भाजप मागील जागांपेक्षा 23-25 जागांवर पिछाडीवर आहे. तर राष्ट्रवादीने मुसंडी मारली आहे.

'इस बार 200 पार' असा नारा भाजपचे नेते अमित शहा यांनी दिला होता. भाजपच्या चाणक्यांनी अंदाज वर्तवल्यानंतर भाजपमध्ये कमालीचा उत्साह पाहण्यास मिळत होता. परंतु, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केलेल्या आक्रमक प्रचारानंतर आता कुठे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप आणि युतीने आघाडी जरी घेतली असली तरी मागील निवडणुकीचा निकाल पाहात दोन्ही पक्षांच्या जागेत घट झाली आहे. भाजपला तर तब्बल 23 ते 25 जागांवर पिछाडीवर आहे. भाजपचे 12 मंत्री जवळपास पिछाडीवर आहे. परळीतून पंकजा मुंडे तर पुण्यात 2 मंत्री पिछाडीवर आहे. एवढंच नाहीतर अनेक विद्यमान आमदारही मागे पडले आहे.

तर शिवसेनेलाही 2 जागांवर पिछाडीवर आहे. सेनेच्या नेत्यांनी तर 100 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. परंतु, सेनेला आतापर्यंत 62 जागांवर आघाडी मिळाली आहे. म्हणजेच, मागील निवडणुकीचा जो निकाल होता त्याचीच बरोबर सेना करत आहे.

भाजपने एकीकडे मेगाभरती केली तर दुसरीकडे मोठी बंडखोरीही सहन करावी लागली. त्यामुळेच भाजपला हा फटका बसला असल्याचं बोललं जात आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मेहनत कामी आली आहे. राष्ट्रवादीने मागील निवडणुकीपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. अजित पवार, रोहित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेते आघाडीवर आहे. राष्ट्रवादीने मागील निवडणुकीत 42 जागा जिंकल्या होत्या, आता 12-13 जागांवर आघाडीवर आहे. परंतु, दुसरीकडे काँग्रेसने आपले गड कायम राखले आहे. तरीही 2-3 जागांवर नुकसान होताना दिसत आहे.

अजून मतमोजणी सुरू असून काही तासांमध्ये संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

==============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 10:49 AM IST

ताज्या बातम्या