उद्धव ठाकरेंवर टीका पडली भारी, सेनेच्या उमेदवारानेच हर्षवर्धन जाधवांना हरवले दारी!

उद्धव ठाकरेंवर टीका पडली भारी, सेनेच्या उमेदवारानेच हर्षवर्धन जाधवांना हरवले दारी!

कन्नड मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांनी जाधवांना पराभूत केलं.

  • Share this:

कन्नड, 24 ऑक्टोबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणे हर्षवर्धन जाधव यांना चांगलेच महागात पडले. विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव पराभूत झाले आहे.

कन्नड मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांनी जाधवांना पराभूत केलं. आपल्याच होमग्राऊंडमध्ये जाधव यांना 60298 मतं मिळवून तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

विशेष म्हणजे, हर्षवर्धन जाधव हे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. हर्षवर्धन जाधव लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर विधानसभेतही उभे राहिले. परंतु, प्रचारादरम्यान त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती.

त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात कन्नड पोलीस ठाण्यांमध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधवांच्या त्या कथित वक्तव्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आदर्श आचारसंहिता प्रमुखांकडे तक्रार करण्यात आली. आचारसंहिता पथकप्रमुख राममहेंद्र डोंगरदिवे यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम 188 प्रमाणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल केल्यानंतर काही अज्ञातांकडून हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्लाही करण्यात आला होता. औरंगाबाद शहरातील समर्थनगर भागातील हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर रात्री 1 च्या सुमारास चार अज्ञातांनी घरावर आणि गाड्यांवर दगडफेक केली. हल्लेखोर 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा देत होते.

थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले होते. अखेर सेनेच्याच उमेदवाराने जाधवांना आस्मान दाखवत पराभूत केलं. विशेष म्हणजे, जाधव हे शिवसेनेतच होते. परंतु, मराठा आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी राजीनामा दिला होता.

========================

Published by: sachin Salve
First published: October 24, 2019, 7:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading