Election Result 2019 LIVE: अखेर अब्दुल्ल सत्तारांनी 'करून दाखवलं'

अब्दुल सत्तारांना आयत्यावेळी सेनेनं आपल्या पक्षात घेतले, त्यामुळं सिल्लोडमधील राजकीय चित्र बदलले.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 02:54 PM IST

Election Result 2019 LIVE: अखेर अब्दुल्ल सत्तारांनी 'करून दाखवलं'

सिल्लोड, 24 ऑक्टोबर : काँग्रेसला रामराम ठोकून भाजप व्हाया शिवसेनेत दाखल झालेले अब्दुल्ल सत्तार विजयी झाले आहे. सत्तार यांनी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवाराचा पराभव केला.

अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीतच भाजपच्या संपर्कात होते. त्यानंतर मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि सेनेकडून उमेदवारी मिळवली. आज सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत सत्तार यांनी आघाडी घेतली होती. अखेरच्य फेरी अखेर सत्तार यांनी मोठी आघाडी घेत विजय मिळवला.

विशेष म्हणजे, औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात कमी उमेदवार आणि मतदानाचा टक्का वाढलेला हे सिल्लोड मतदारसंघाचे वैशिष्ट्यं ठरलं होतं. यामुळं सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात सेनेचे अब्दुल सत्तार आणि अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांच्यात एकतर्फी लढत झालेली पाहायला मिळाली.

अब्दुल सत्तारांना आयत्यावेळी सेनेनं आपल्या पक्षात घेतले, त्यामुळं सिल्लोडमधील राजकीय चित्र बदलले. अब्दुल सत्तार हे माजी राज्यमंत्री, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिले होते. दरम्यान, त्यांच्या शिवसेने प्रवेशाला भाजपला रूचला नव्हता. त्यामुळे भाजपच्या नाराज नेत्यांनी आणि इतर पक्षांनी एकत्र येत अपक्ष प्रभाकर पालोदकर यांना पाठिंबा दिला होता. परंतु, शिवसैनिकांनी किल्ला लढवत सत्तार यांना विजयी केलं.

========================

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 02:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...