एकनाथ खडसेंवर अन्याय करणाऱ्या भाजपला धडा शिकवू, लेवा पाटील समाजाचे पत्र व्हायरल

भाजपला चांगलाच धडा शिकवू. तसेच भाजपच्या उमेदवारांना मतदान करू नये, अशा आवाहनाचे लेवा पाटील समाजाचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 12, 2019 05:53 PM IST

एकनाथ खडसेंवर अन्याय करणाऱ्या भाजपला धडा शिकवू, लेवा पाटील समाजाचे पत्र व्हायरल

इम्तियाज अहमद,(प्रतिनिधी)

भुसावळ,12 ऑक्टोबर: भाजपने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या यादीपासून तर चौथ्या यादीपर्यंत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली नाही. निष्ठावंत नाथाभाऊंवर भाजपने अन्याय केली आहे. भाजपला चांगलाच धडा शिकवू. तसेच भाजपच्या उमेदवारांना मतदान करू नये, अशा आवाहनाचे लेवा पाटील समाजाचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे एका नव्या चर्चेला उधाण आले आहे.

लेवा पाटीदार फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निलेश केशव महाजन यांनी रमेश विठू पाटील (कुटुंब नायक), भोरगाव लेवा पंचायत, व्हाया पाडळसे, यांना हे पत्र पाठवले आहे. एकनाथ खडसेंना भाजपने उमेदवारी न देऊन त्यांच्यावर भाजपने अन्याय केला आहे. सकल लेवा पाटील समाज भाजपला मतदान करणार नाही व त्या पक्षाला धडा शिकवू असे संबोधले होते. आपला समाजातील उमेदवाराच मतदान करावे, ज्या ठिकाणी समाजातील व्यक्ती उमेदवार म्हणून उभे नसतील त्याठिकाणी नोटावर मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले होते.

आधी घेतला होता हा पवित्रा...

Loading...

लेवा पाटीदार समाजाचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळाली नाही तर महाराष्ट्रातील जिथे-जिथे लेवा पाटीदार समाज आहे, तिथे भाजपला मतदान करणार नाही, असा पवित्रा घेतला होता. मात्र, भाजपने एकनाथ खडसे यांची उमेदवारी काढून त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे कुठेतरी लेवा पाटीदार समाजाला शांत करण्याचे काम भाजपने केल्याचे दिसते. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून लेवा समाजाचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांच्या नावे लेटरपॅडवर भाजपच्या उमेदवारांना मतदान करू नये, अशा आवाहनाचे पत्र फिरत आहे.

पत्राबाबत काय म्हणाले नाथाभाऊ...

या पत्राबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, लेवा पाटीदार समाजाचा संघटनेने आवाहन केले असून नाथाभाऊंवर झालेल्या अन्यायामुळे आवाहन करण्यात आले आहे. मात्र,ज्या ठिकाणी विकासाची कामे झालेली यादी जिथे मोदींचे नेतृत्व आहे, अशा ठिकाणी मतदान करावे, अशी विनंती मी केली असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. मात्र,या पत्राबाबत बोरगाव लेवा समाजाचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले पत्र ही बनावट असल्याचे म्हटले आहे. कुठल्याही प्रकारे या पक्षाला मतदान करा किंवा करू नये, असे म्हटले नाही.

VIDEO:PMC चे खातेदार 'राज'दरबारी, बैठकीबाबत शर्मिला ठाकरे म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 05:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...