विजयी उमेदवाराला 'NOTA'ची टक्कर, लढतीत युती जवळपासही नाही!

विजयी उमेदवाराला 'NOTA'ची टक्कर, लढतीत युती जवळपासही नाही!

निवडणुकीला उभा असलेल्या उमेदवारांपैकी कोणीही नको यासाठी 'नोटा'चे बटण देण्यात येतं. याचा पुरेपूर वापर एका मतदारसंघात झाला आहे.

  • Share this:

लातूर, 24 ऑक्टोबर : राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. गेल्या विधानसभेच्या तुलनेत यावेळी भाजप शिवसेनेच्या जागा कमी झाल्या आहेत.  काँग्रेस राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी धक्कादायक निकालाची नोंद केली. दरम्यान, सध्या लातूर ग्रामीणमधील निकालाची चर्चा सर्वत्र होत आहे. लातूर शहर आणि ग्रामीण ही दिवंगत विलासराव देशमुख यांच्या  कुटुंबासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या जागेवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख विजयी झाले आहेत. त्यांना 1 लाख 31 हजार 321 मते मिळाली. लातूर ग्रामीण मतदारसंघात आघाडीवर  धीरज देशमुख यांना कोणताही उमेदवार नाही तर नोटाने टक्कर दिली. त्यांच्यानंतर 26 हजार 899 इतके मते NOTA ला दिली आहेत. विजयी उमेदवारानंतर दुसऱ्या क्रमांकावर नोटाला मते मिळाली आहेत. त्यानंतर इतर उमेदवार आहेत. यातही तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या युतीच्या उमेदवारापेक्षा दुप्पट मते नोटाला आहेत. तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे रवी रामराजे देशमुख हे आहेत. त्यांना 13 हजार 113 मते मिळाली आहेत.  इतर सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.

वाचा : विधानसभेची अटीतटीची लढत, प्रणिती शिंदे यांचा सोलापूरमध्ये विजय

लातूर ग्रामीण हा लातूर तालुक्यातलाच 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत तयार झालेला मतदारसंघ. याआधी शिवराज पाटील आणि त्यानंतर विलासराव देशमुख यांच्यामुळं या लातूरवर कायमच कॉंग्रसचे वर्चस्व राहिले आहे. आता याच लातुरच्या ग्रामीण मतदारसंघातून दिवंगत विलासरावांचे चिरंजीव धीरज देशमुख आपले नशीब आजमावले. याआधी त्यांनी याच भागातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती.

वाचा : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच 'भाजप'ला धक्का, विदर्भानं बिघडवलं गणित!

LIVE VIDEO : छगन भुजबळांनी भाजपला सुनावले, उदयनराजेंना फटकारले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 05:04 PM IST

ताज्या बातम्या