महाराष्ट्राचा महासंग्राम : कोपरगावमध्ये रंगतदार लढतीची चिन्हं

भाजप आणि शिवसेना मागच्या विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे लढले होते. कोपरगाव हा पारंपरिक पद्धतीने शिवसेनेचा मतदारसंघ आहे. पण तरीही आता हा मतदारसंघ भाजपकडेच जाण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2019 04:34 PM IST

महाराष्ट्राचा महासंग्राम : कोपरगावमध्ये रंगतदार लढतीची चिन्हं

कोपरगाव, 17 सप्टेंबर : कोपरगाव मतदारसंघात अनेक वर्षं काळे आणि कोल्हे यांच्यामध्येच सत्तासंघर्ष होतो आहे. आता मात्र या घराण्यांच्या बाहेरचे लोकही उमेदवारीसाठी दावा करू लागले आहेत.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव कोल्हे यांनी आपल्या मुलाऐवजी सूनबाई स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी स्नेहलता कोल्हे यांनी राष्ट्रवादी सोडली आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यांनी राष्ट्रवादीच्या आशुतोष काळे यांचा 20 हजार मतांनी पराभव केला.

या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा तयारी सुरू केली आहे. त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनांतून आपला जनसंपर्क वाढवला आहे. तर दुसरीकडे भाजपच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही जय्यत तयारी केलीय.

मागच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले होते. कोपरगाव हा पारंपरिक पद्धतीने शिवसेनेचा मतदारसंघ आहे. पण तरीही आता हा मतदारसंघ भाजपकडेच जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत प्रवेश करणार का? उर्मिला मातोंडकरांनी दिलं हे स्पष्टिकरण!

Loading...

काळे - कोल्हे यांच्या वर्चस्वाला धक्का देत भाजपचे विजय वहाडणे यांनी अपक्ष निवडणूक लढवत नगरपालिकेचं नगराध्यक्ष मिळवलं. त्यांना या विधानसभा निवडणुकीत उभं राहण्याची इच्छा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेव्हणे राजेश परजणे यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केलीय.त्यामुळे इथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

युतीकडून भाजपच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे तर आघाडीकडून राष्ट्रवादीचे आशुतोष काळे हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. जर युती झाली नाही तर राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेव्हणे राजेश परजणे हे शिवसेनेकडून इच्छुक आहेत. वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार दिला तर इथली निवडणूक जास्तच रंगतदार होण्याची चिन्हं आहेत.

=================================================================================

VIDEO: मनसेचं इंजिन कुठे अडकलं, राज निर्णय घेत नसल्याने मनसैनिक अस्वस्थ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 04:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...