पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का, माजी खासदाराचा भाजप प्रवेश निश्चित

लोकसभेतील उमेदवारच पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 07:18 PM IST

पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का, माजी खासदाराचा भाजप प्रवेश निश्चित

संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 26 ऑगस्ट :  कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. धनंजय महाडिक यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असल्याचीही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. लोकसभेतील उमेदवारच पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना कोल्हापूरमधून लोकसभेची उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीसह काँग्रेसमधीलही स्थानिक नेत्यांचा विरोध होता. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांच्या पारड्यात आपलं मत टाकत त्यांना उमेदवारी दिली. देशातील मोदी लाट आणि काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी विरोधात केलेलं काम यामुळे महाडिकांना मोठा पराभव सहन करावा लागला.

धनंजय महाडिक सध्या मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. महाडिक यांच्या भाजप प्रवेशाची तारीख उद्या निश्चित होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यातच आता कोल्हापूरमधील ताकदवान नेता सोडून जात असल्याने राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसणार आहे.

दरम्यान, धनंजय महाडिक यांनी आतापर्यंत 2 वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. महाडिक यांनी मे महिन्याच्या अखेरीस भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली होती. तेव्हाच धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता निर्माण झाली होती. पण त्यानंतर धनंजय महाडिक यांनी भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळली होती.

'साखर कारखान्यांच्या कामासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. केंद्र सरकारकडून साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन दिलं जाणार आहे. पण काही कारखान्यांना या योजनेत स्थान देण्यात येणार नव्हतं. यासंदर्भातच मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. आजही अनेक कारखानदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. मी भाजपमध्ये जाणार ही अफवा आहे. भविष्यातही मी राष्ट्रवादीच राहणार आहे,' असा दावा तेव्हा महाडिक यांनी केला होती. पण आता विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच महाडिक भाजपमध्ये प्रवेश करणार, हे निश्चित समजलं जात आहे.

Loading...

मटकी फुटली अन् गोविंदा थेट वरच्या थरावरून जमिनीवर पडला, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 01:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...