राष्ट्रवादीनंतर भाजपच्याही उमेदवाराने काढली विजयी मिरवणूक, निकालाआधीच फटाके

खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने निकालापूर्वीच विजयाचे होर्डिंग्ज झळकावले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 10:39 AM IST

राष्ट्रवादीनंतर भाजपच्याही उमेदवाराने काढली विजयी मिरवणूक, निकालाआधीच फटाके

पुणे, 22 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर पुण्यातील खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांच्या समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली. त्यानंतर शिवाजीनगर येथील भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनीही स्वत:च आपल्या विजयावर शिक्कामोर्तब करत फटाके फोडल्याचं पाहायला मिळालं.

भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांचे सुपुत्र सिद्धार्थ शिरोळे हे शिवाजीनगर मतदरासंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. भाजपने सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांना पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ही निवडणूक सिद्धार्थ शिरोळे यांना अवघड जाईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता मतदानानंतर निकालाआधीच सिद्धार्थ शिरोळे यांनी विजयी मिरवणूक काढली आहे.

दुसरीकडे, खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने निकालापूर्वीच विजयाचे होर्डिंग्ज झळकावलेत. सचिन दोडके आमदारपदी निवड झाल्याबद्दल वारज्यामध्ये बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे लोकसभेला सुप्रिया सुळे या मतदारसंघातून पिछाडीवर होत्या. तरीही विधानसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवारानं निकालाआधीच विजयाचा दावा केला.

महापालिका निवडणुकीच्या निकालाआधी सुद्धा सचिन दोडके यांनी असेच फलक लावले होते. विशेष म्हणजे त्यावेळी पुण्यात भाजपची लाट असतानाही दोडके यांच्या प्रभागात मात्र चारही राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे याच कामगिरीची पुनरावृत्ती सचिन दोडके विधानसभा निवडणुकीतही करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, News18 Lokmat आणि IPSOS च्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदात EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. या पोलनुसार, पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

Loading...

2019 मतदानोत्तर चाचणी

भाजप - 141

सेना - 102

काँग्रेस - 17

राष्ट्रवादी - 22

MIM - 01

मनसे - 01

इतर - 02

अपक्ष - 03

EXIT POLL मध्ये कोण ठरलं पैलवान? पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 09:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...