राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं 'उदयनराजे स्टाईल' सेलिब्रेशन, काढली विजयी मिरवणूक

राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं 'उदयनराजे स्टाईल' सेलिब्रेशन, काढली विजयी मिरवणूक

उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरीही त्यांच्यासारखी स्टाईल करण्याचा मोह राष्ट्रवादीच्या नेत्यांना अजूनही आवरत नसल्याचं दिसत आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 22 ऑक्टोबर : राष्ट्रवादीत असलेल्या उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी आता पुन्हा एकदा पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीसाठी काल (सोमवारी)मतदानही झालं. उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरीही त्यांच्यासारखी स्टाईल करण्याचा मोह राष्ट्रवादीच्या नेत्यांना अजूनही आवरत नसल्याचं दिसत आहे.

कोल्हापूरमधील कागल मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी निवडणूक निकालाआधीच विजय मिरवणूक काढली आहे. तसंच आपल्या शांत, संयमी स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुश्रीफ यांनी यावेळी उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवल्याचंही पाहायला मिळालं. यावेळी मुश्रीफ समर्थकांनी गुलालाची उधळण करत कागलमध्ये मिरवणूक काढली.

निकालाआधीच फटाके, उमेदवारांनी काढली मिरवणूक

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर पुण्यातील खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांच्या समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली. त्यानंतर शिवाजीनगर येथील भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनीही स्वत:च आपल्या विजयावर शिक्कामोर्तब करत फटाके फोडल्याचं पाहायला मिळालं.

भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांचे सुपुत्र सिद्धार्थ शिरोळे हे शिवाजीनगर मतदरासंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. भाजपने सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांना पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ही निवडणूक सिद्धार्थ शिरोळे यांना अवघड जाईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता मतदानानंतर निकालाआधीच सिद्धार्थ शिरोळे यांनी विजयी मिरवणूक काढली आहे.

VIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी

First published: October 22, 2019, 1:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading