उमेदवारी नाकारलेल्या भाजप कार्यकर्त्याचा संताप, पोस्टरवर लिहिलं...!

उमेदवारी नाकारलेल्या भाजप कार्यकर्त्याचा संताप, पोस्टरवर लिहिलं...!

विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे बडकस चौकावर निषेधाचे बॅनर झळकवण्यात आले आहेत. जातीचं राजकारण कधीपर्यंत चालेल असा प्रश्न यातून विचारण्यात आला आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद वाढतो की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  • Share this:

नागपूर, 02 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर भाजपची डोकेदुखी वाढली आहे. कारण तिकीट न मिळालेल्या नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. मध्य नागपूर मतदारसंघात भाजप शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांना उमेदवारी न देता विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिल्याने भाजप कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती देण्यात आली आहे. आमदारांच्या आणि इच्छुकांच्या नाराजीमुळे भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू असल्याचं समोर आलं आहे.

विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे बडकस चौकावर निषेधाचे बॅनर झळकवण्यात आले आहेत. जातीचं राजकारण कधीपर्यंत चालेल असा प्रश्न यातून विचारण्यात आला आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद वाढतो की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपण 21 व्या शतकाच्या गोष्टी करतो आणि आपणच जातीवर उमेदवार उभे करतो असा प्रश्न या बॅनरवर विचारण्यात आला आहे. त्यावर आता भाजप कशी प्रतिक्रिया देणार आणि नाराज आमदांना कसं समजवणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

एककीडे नाराजीमुळे वाद वाढत आहे तर दुसरीकडे बंडखोरी सुरू झाल्यामुळे भाजपची डोकोदुखी वाढली आहे. युतीतील बंडखोरांनी आता आघाडीशी जवळीक केल्याचंही पाहायला मिळत आहे. तर काही बंडखोरांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे.

नाशिकमधील दोन माजी आमदार आघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. यामध्ये वसंत गीते आणि माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे नाशिकमधील शिवसेनेचे ताकदवान नेते संतोष शिंदे हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

इतर बातम्या- विधानसभेसाठी बीडमध्ये होणार मोठं शक्तीप्रदर्शन, मेळाव्याला अमित शहा येणार

1. वसंत गीते

- माजी आमदार मनसे

- 2014च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर केला होता भाजपात प्रवेश

- विद्यमान भाजप प्रदेश उपाध्यक्ष

- नाशिक मध्यमधून होते इच्छुक

- भाजपनं देवयानी फरांदे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानं नाराज

- समर्थकांसोबत बैठक

- आघाडीच्या नेत्यांच्या संपर्कात

2. माणिकराव कोकाटे

- माजी आमदार सिन्नर

- एकेकाळी नारायण राणे यांचे कट्टर समर्थक

- सेना उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी 2014 ला केला होता पराभव

- मुलूखमैदानी तोफ म्हणून ओळख

- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं तिकीट दिलं नाही म्हणून केली होती बंडखोरी

- विधानसभेलाही तिकीट नाकारल्यानं पुन्हा बंडखोरी

- राष्ट्रवादीच्या संपर्कात

इतर बातम्या -  'फक्त काही तास बाकी, वादळापूर्वीची शांतता'; नितेश राणेंच्या ट्वीटमुळे खळबळ

3. विलास शिंदे

- 30 वर्षांपासून कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख

- पालिकेत विद्यमान शिवसेना गटनेता

- नाशिक पश्चिममधील प्रभावशाली नेता

- समर्थक आणी कार्यकर्त्यांची मोठी ताकद

- नाशिक पश्चिम जागेसाठी होते आग्रही

- जागा पून्हा एकदा भाजपला

- कोणत्याही पक्षात न जाता अपक्ष लढवणार

- हा शिवसेना संपवण्याचा, भाजपचा डाव असा केलाय आरोप

इतर बातम्या - गणेश नाईकांबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्य, भाजप मंत्र्यांचं मोठं विधान

4. दिंडोरीत रामदास चारोस्कर (शिवसेना)बंडखोरी करण्याची शक्यता

5. इगतपुरीत काशिनाथ मेंगाळ हे बंडखोरीच्या तयारीत

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीमध्ये विद्यमान 12 आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. दरम्यान, नागपूर दक्षिण-पश्चिम- देवेंद्र फडणवीस, कोथरूड- चंद्रकांत पाटील, सातारा- शिवेंद्रराजे भोसले, कसबा- मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

इतर बातम्या - 'होय, आमच्या बाबत घेवाण कमी आणि देवाणच जास्त झाली'

भाजपच्या पहिल्या यादीत एकनाथ खडसे, विनोद तावडे या नेत्यांची नावं नाहीत. एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. त्याचबरोबर गणेश नाईक यांचंही नाव नाही. या यादीवर नजर टाकली तर घराणेशाहीची अनेक उदाहरणं दिसतात. भाजप नेत्यांचा मुलगा, जावई, मुली, सुना या सगळ्यांची नावं यादीत आहेत.

Published by: Renuka Dhaybar
First published: October 2, 2019, 10:28 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading