फडणवीस सरकारमधील 5 मंत्र्यांचा पराभव, पवारांचा दणका!

फडणवीस सरकारमधील 5 मंत्र्यांचा पराभव, पवारांचा दणका!

राज्यात पुन्हा युतीचं सरकार येणार असलं तरी भाजप-शिवसेनेला या निकालाने अनेक धक्के दिले आहेत.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. राज्यात पुन्हा युतीचंच सरकार येणार असलं तरी युतीला दणका बसल्याचं दिसत आहे. यावेळी युतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला होता. पण हा आकडा आता 150 ते 160 वर पोहचला आहे. 2014 मध्ये युतीला 189 जागा मिळाल्या होत्या. आता तेवढ्या जागा मिळणंही कठीण दिसत आहे. दुसरीकडे फडणवीस सरकारमधील 5 मंत्र्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे रोहित पवार विजयी झाले. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या रोहित पवार यांनी भाजपचे मंत्री राम शिंदेंचा पराभव केला. राम शिंदे हे फडणवीस सरकारमध्ये जलसंवर्धन मंत्री होते. याशिवाय राज्यात सर्वात मोठी आणि लक्षवेधी ठरलेल्या लढतीत पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का बसला आहे. पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी पराभूत केलं. पंकजा मुंडे यांच्याकडे महिला आणि बालकल्याण मंत्रीपद होते. त्यांना 20 हजार मतांनी पराभूत व्हावं लागलं.

वाचा : भाजपनंतर शिवसेनेलाही मराठवाड्यात मोठा धक्का, आणखी एका मंत्र्याचा पराभव

भाजपला अपेक्षित असं यश निवडणुकीत मिळालं नाही. भाजप नेते आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीच्या सुनिल शेळकेंनी विजय मिळवला. दुसरीकडे शिवसेना नेते विजय शिवतारे यांना काँग्रेसचे संजय जगताप यांचा पराभव केला.पुरंदरमध्ये राष्ट्रवादीने विशेषत अजित पवार यांनी ताकद लावली होती. जालन्यात शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकरांचा पराभव झाला आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या गोरंट्याल यांनी विजय मिळवला.

वाचा : उदयनराजेंना दिल्ली दूर करणाऱ्या श्रीनिवास पाटलांची पहिली प्रतिक्रिया

दुपारपर्यंतचे कल हाती आले त्यामध्ये भाजपचे 99 उमेदवार आघाडीवर होते तर सेनेचे 59 उमेदवार आघाडीवर होते. काँग्रेस-राष्ट्रवादीने 99 जागांवर आघाडी घेतली होती. 2014 च्या तुलनेत भाजपला यावेळी 20 पेक्षा जास्त जागांचा फटका बसला आहे.

वाचा : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच 'भाजप'ला धक्का, विदर्भानं बिघडवलं गणित!

LIVE VIDEO : छगन भुजबळांनी भाजपला सुनावले, उदयनराजेंना फटकारले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 03:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading