भाजप-शिवसेनेचा युतीचा लवकरच 'घट' बसणार.. असा आहे अंतिम फॉर्म्युला

भाजप-शिवसेनेचा युतीचा लवकरच 'घट' बसणार.. असा आहे अंतिम फॉर्म्युला

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप-शिवसेनेत युती होणारी की नाही याविषयी चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, अखेर दोन्ही पक्षांकडून युती होणार असल्याचे संकेत आता मिळताहेत.

  • Share this:

मुंबई,29 सप्टेंबर: गेल्या अनेक दिवसांपासून भाजप-शिवसेनेत युती होणारी की नाही याविषयी चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, अखेर दोन्ही पक्षांकडून युती होणार असल्याचे संकेत आता मिळताहेत. त्यामुळे भाजप शिवसेनेचा लवकरच 'घट' बसणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. मुखमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून युती होणार असल्याचे संकेत मिळालेत. शनिवारी उद्धव ठाकरे यांनी युती होणार असून जागावाटपावर चर्चा होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर रविवारी दिल्लीत भाजपच्या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळतेय. त्र जागावाटपाविषयी अधिकृत माहिती हाती आली नाहीये.

युतीचा अंतिम फॉर्म्युला!

भाजप- 144

शिवसेना- 126

मित्रपक्ष- 18

भाजपच्या मुख्यालयात महत्त्वाची बैठक सुरू

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत होतेय.. या बैठकीला संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास सुरुवात झालीये.. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील उपस्थित आहेत.. आजच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय होणार आहे.

युतीची अधिकृत घोषणेपूर्वीच शिवसेनेने उमेदवारांना वाटले AB फॉर्म..

शिवसेना आणि भाजपच्या युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेने त्यांच्या उमेदवारांना AB फॉर्म वाटण्यास केली सुरवात.शिवसेनेनं त्यांच्या कोट्यातील मतदारसंघातील उमेदवारांना AB फार्म वाटण्यास सुरवात केली आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील उमेदवारांना AB फॉर्म वाटण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्रातील विविध मतदारसंघातील जे उमेदवार मुंबईत उपस्थित आहेत त्यांना देखील AB फॉर्म देण्यात आलेत. सध्या युतीत ज्या मतदारसंघाचा जागावाटपाचा प्रश्न सुटलेला आहे. अशाच मतदारसंघातील उमेदवारांना शिवसेना AB फॉर्म देत असल्याची माहीती मिळाली आहे.

VIDEO:अजित पवार कुठून लढणार? जयंत पाटलांनी केलं जाहीर

Published by: Sandip Parolekar
First published: September 29, 2019, 6:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading