Home /News /maharashtra /

EXIT POLL : पश्चिम महाराष्ट्रात युती 'आघाडी'वर, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका

EXIT POLL : पश्चिम महाराष्ट्रात युती 'आघाडी'वर, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका

राज्यात पुन्हा एकदा भाजप-सेनेचं सरकार येणार असून काँग्रेस राष्ट्रवादीला फक्त 41 जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.

    मुंबई, 21 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान आज पार पडलं. मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. दरम्यान, News18 Lokmatने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला फक्त 41 जागा तर महायुतीला 243 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही भाजप जोरदार मुसंडी मारणार असंच चित्र यामध्ये दिसत आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला शंभरी गाठता आली नव्हती. तर आता एक्झिट पोलमध्ये आघाडीला 41 जागा मिळतील असं समोर आलं आहे. तर भाजप शिवसेना युतीला तब्बल 243 जागा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना-भाजपला 2014 च्या तुलनेत 11 जागा जास्त मिळण्याची शक्यता आहे. यावेळी युतीला 43 तर आघाडीला 23 जागा मिळतील असं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. एक्झिट पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रात 27 जागा भाजपला तर 16 जागा शिवसेनेला मिळतील. तर आघाडीच्या जागा कमी होण्याची चिन्हे असून काँग्रेसला 7 तर राष्ट्रवादीला 15 आणि इतर एक उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 66 विधानसभेच्या जागा असून 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेला 12, भाजपला 22, राष्ट्रवादीला 18, काँग्रेसला 10 तर रासप, शेकपा, एमएनएस आणि अपक्ष असे प्रत्येकी एक जागा जिंकली होती. EXIT POLL: वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरेंना मिळणार का जनतेचा कौल? त्याआधी 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 23 आणि काँग्रेसला 14 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर भाजप 10 आणि शिवसेनेला 9 जागा मिळाल्या होत्या. तर तब्बल 7 जागी अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकपा आणि एमएनएसला एक जागा मिळाली होती. वाचा : उत्तर महाराष्ट्रात 36 पैकी 31 जागांवर भाजप-शिवसेना महायुतीची 'आघाडी' 2014 च्या निवडणुकीत काय झालं? 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या. वाचा : विदर्भात महायुतीचंच वर्चस्व, News 18 लोकमत आणि IPSOS च्या सर्व्हेचा अंदाज या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं. LIVE EXIT POLL : केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र; महाराष्ट्रात युती ऐतिहासिक महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा आणि 2014 चं पक्षीय बलाबल एकूण जागा - 288 भाजप - 122 शिवसेना - 63 काँग्रेस - 42 राष्ट्रवादी - 41 घोड्यावर बसून तरुण आले मतदानाला, पाहा VIDEO

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    First published:

    Tags: Kolhapur North s13a276, Maharashtra Assembly Election 2019, Pune S13p34, Sangli s13a282, Satara s13a262, Western maharashtra

    पुढील बातम्या