EXIT POLL मधील 'या' आकड्यांमुळे वाढू शकते शिवसेनेचीही डोकेदुखी

EXIT POLL मधील 'या' आकड्यांमुळे वाढू शकते शिवसेनेचीही डोकेदुखी

विविध संस्थांच्या एक्झिट पोलमधून महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल (सोमवारी) मतदान झालं. त्यानंतर आलेल्या विविध संस्थांच्या एक्झिट पोलमधून महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र त्याचवेळी एक्झिट पोलचे हे आकडे खरे ठरले तर शिवसेनेचीही डोकेदुखी वाढू शकते.

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे बहुमताचा 145 हा आकडा गाठण्यासाठी भाजपला शिवसेनेचीही मदत घ्यावी लागली. त्यानंतर भाजप-शिवसेनेचं सरकार स्थापन झालं. मात्र आताच्या विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या News18 Lokmat आणि IPSOS च्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 141 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर शिवसेनेला 102 जागा मिळतील, असं हा एक्झिट पोल सांगतो.

एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी अवघ्या 4 आमदारांची गरज भासणार आहे. अशावेळी भाजपकडून अपक्षांची मदत घेऊन बहुमताचा जादुई आकडा गाठण्याचा प्रयत्न होऊ शकतो. यामुळेच मग मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा चांगल्या जागा मिळूनही शिवसेनेवर सत्तेपासून दूर राहण्याची नामुष्खी ओढावू शकते.

दरम्यान, News18 Lokmat आणि IPSOS च्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदात EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. या पोलनुसार, पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

2019 मतदानोत्तर चाचणी

भाजप - 141

सेना - 102

काँग्रेस - 17

राष्ट्रवादी - 22

MIM - 01

मनसे - 01

इतर - 02

अपक्ष - 03

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा आणि 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

कोणत्या विभागात कोणत्या पक्षाची काय होती स्थिती?

पश्चिम महाराष्ट्र

एकूण जागा - 58

भाजप - 19

शिवसेना - 12

काँग्रेस - 7

राष्ट्रवादी - 16

इतर - 4

उत्तर महाराष्ट्र

एकूण जागा - 47

भाजप - 19

शिवसेना - 8

काँग्रेस - 10

राष्ट्रवादी - 8

इतर - 2

मराठवाडा

एकूण जागा - 46

भाजप - 15

शिवसेना - 11

काँग्रेस - 9

राष्ट्रवादी - 8

इतर - 3

विदर्भ

एकूण जागा - 62

भाजप - 44

शिवसेना - 4

काँग्रेस - 10

राष्ट्रवादी - 1

इतर - 3

कोकण

एकूण जागा - 75

भाजप - 25

शिवसेना - 28

काँग्रेस - 6

राष्ट्रवादी - 8

इतर - 8

EXIT POLL मध्ये कोण ठरलं पैलवान? पाहा हा VIDEO

First published: October 22, 2019, 8:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading