EXIT POLL : कोल्हापूरचा पैलवान पुण्याचं मैदान मारणार का?

भाजप सेना महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधून निवडणूक लढवली. त्यांच्या विरुद्ध असलेल्या मनसे उमेदवाराला आघाडीने पाठिंबा दिल्याने ही लढत रंगतदार झाली असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 07:52 PM IST

EXIT POLL : कोल्हापूरचा पैलवान पुण्याचं मैदान मारणार का?

मुंबई, 21 ऑक्टोबर : राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र सरकार येणार असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवला जात आहे. यामध्ये युतीला 243 जागा मिळतील तर आघाडीला यावेळी पन्नाशीदेखील गाठणं कठीण जाणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकूणच लोकसभेप्रमाणं विधानसभेतही भाजपच बाजी मारणार असं चित्र दिसत आहे.

News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदात EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. News18 Lokmat च्या exit poll मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

दरम्यान, महायुतीचे उमेदवार आणि भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील हे पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून मैदानात उतरले होते. त्यांच्या उमेदवारीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. स्थानिक उमेदवाराऐवजी बाहेरचा उमेदवार दिल्यानं नाराजीनाट्य रंगले होते. तरीही बंडखोरी आणि नाराजी दूर केल्यानं चंद्रकांत पाटील यांच्या बाजूने इथं वातावरण तयार झालं होतं. तसेच कोथरूडमध्ये चंद्रकांत दादा पाटीलच बाजी मारणार असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.

पुण्यातील कोथरूड मतदार संघात चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांचे आव्हान होते. पुण्यात कसबा इथं राज ठाकरे यांनी सभा घेतली होती. तर मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता त्यामुळेच ही लढत रंगतदार झाली होती.

महायुतीतील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महायुतीला 250 जागा मिळतील आणि कोथरूड मतदारसंघातून 1 लाख 60 हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला होता.

Loading...

वाचा : उत्तर महाराष्ट्रात 36 पैकी 31 जागांवर भाजप-शिवसेना महायुतीची 'आघाडी'

2014 च्या निवडणुकीत काय झालं?

2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

वाचा : विदर्भात महायुतीचंच वर्चस्व, News 18 लोकमत आणि IPSOS च्या सर्व्हेचा अंदाज

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

LIVE EXIT POLL : केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र; महाराष्ट्रात युती ऐतिहासिक

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा आणि 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

घोड्यावर बसून तरुण आले मतदानाला, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 07:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...