रोहित पवार जिंकणार तर परळीमध्ये टफ फाईट, महाराष्ट्राच्या 20 जागांचा नवा EXIT POLL

रोहित पवार जिंकणार तर परळीमध्ये टफ फाईट, महाराष्ट्राच्या 20 जागांचा नवा EXIT POLL

कर्जत जामखेड मतदारसंघात अजित पवार यांचे पुतणे रोहित पवारविरुद्ध भाजप मंत्री राम शिंदे असा रंगतदार सामना आहे.

  • Share this:

मुंबई, 23 ऑक्टोबर : मतमोजणीला काही तास शिल्लक असताना आता आणखी एक EXIT POLL समोर आला आहे. यात सगळ्यात धक्कादायक निकाल हा कर्जत जामखेड मतदारसंघातून देण्यात आला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात अजित पवार यांचे पुतणे रोहित पवारविरुद्ध भाजप मंत्री राम शिंदे असा रंगतदार सामना आहे. पण एका वृत्तवाहिनीने दिलेल्या सर्व्हेनुसार भाजपला इथे धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे रोहित पवार हे बाजी मारतील तर भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव होण्याची शक्यता असल्याचा अंदाज या EXIT POLLच्या माध्यामातून लावण्यात आला आहे.

दरम्यान, India Today या वृत्तवाहिनीने दिलेल्या EXIT POLL नुसार, यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या जागा कमी होणार असल्याचं म्हटलं आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या EXIT POLL नुसार भाजपला 109-124, शिवसेनेला 57-70 तर काँग्रेस 32-40 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, या EXIT POLL मध्ये 20 महत्त्वाच्या VIP जागांवर धक्कादायक निकाल देण्यात आला आहे. पाहुयात कोणत्या आहेत या महत्त्वाच्या जागा...

- आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील विजयी होण्याची शक्यता

- येवला मतदारसंघातून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचा विजय होण्याची शक्यता

- जामनेर मतदारसंघातून भाजपचे गिरीष महाजन हे विजयी होतील असा अंदाज

- नागपूर दक्षिण पूर्व मतदारसंघामधून भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाजी मारतील

- मुंबईच्या वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विजयी होतील असा अंदाज

- कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे बाजी मारण्याची शक्यता

- कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे विजयी होणार असल्याचा अंदाज

इतर बातम्या - यंदा गुलाबी थंडी विसरा, दिवाळीनंतरही पाऊस पिच्छा सोडणार नाही!

- परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे या विजयी होती असा अंदाज

- इस्लामपूर  विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जयंत पाटील विजयी होण्याची शक्यता

- नांदगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे छनग भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ जिंकण्याची शक्यता

- मुक्ताईनगर मतदारसंधातून भाजपच्या रोहिनी खडसे एकनाथ खडसे यांच्या मुलीचा विजय होण्याची शक्यता

- संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात विजयी होण्याची शक्यता

- लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे धिरज देशमुख विलासराव देशमुख यांचे पुत्र जिंकण्याची शक्यता

- लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेसचे अमित देशमुख  विलासराव देशमुख यांचे पुत्र जिंकण्याची शक्यता

- सोलापूर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सुशिलकुमार शिंदे यांच्या मुलीचा विजय होण्याची शक्यता

- कणकवली मतदारसंघातून नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांचा भाजपमधून विजय होण्याची शक्यता

इतर बामतम्या - मतमोजणीच्या तोंडावर नवा सर्व्हे, वंचित आणि मनसे उघणार खातं!

महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. पण त्याआधी मात्र EXIT POLL पोलच्या माध्यमातून कोण बाजी मारणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. News18 Lokmat  आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीसह सर्व इतर माध्यमांनी केलेल्या EXIT POLL  च्या निकालांमध्ये भाजप - शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं दिसतं. मात्र, VDPAने दिलेल्या अंदाजानुसार, भाजपला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 6 एक्झिट पोल्सच्या निकालांमध्ये सर्वांनीच भाजप युतीला बहुमत दिलं आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. TV9मराठी या वृत्तवाहिनीने VDPA च्या सौजन्याने दिलेल्या EXIT POLL नुसार, भाजपला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर वंचित बहुजन आघाडी आणि मनसे आपलं खातं खोलणार असल्याचं म्हटलं आहे.

VDPA च्या सौजन्याने दिलेला EXIT POLL

भाजप - 126-135

शिवसेना - 79-88

काँग्रेस - 16-26

राष्ट्रवादी - 33-43

मनसे - 1

वंचित - 2-5

इतर - 5-13

अन्य बातम्या -

पत्नीच्या मृत्यूनंतर समोर आलं धक्कादायक सत्य, लग्नाआधी पतीने केलं होतं...!

भारत-पाक सीमेवर गोळीबार, महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण!

विधानसभेच्या निकालापूर्वीच काढली विजयी मिरवणूक, NCPच्या 'या' उमेदवारावर गुन्हा

Published by: Renuka Dhaybar
First published: October 23, 2019, 7:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading