एकनाथ खडसेंविरोधात अपक्ष निवडणूक लढणार 'हा' शिवसेना नेता

भाजप-शिवसेनेत युती झाली तरी आपण पक्षाचा राजीनामा देऊन खडसेंच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2019 06:56 PM IST

एकनाथ खडसेंविरोधात अपक्ष निवडणूक लढणार 'हा' शिवसेना नेता

जळगाव,28 सप्टेंबर: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी दंड थोपटले आहेत. मुक्ताईनगर मतदारसंघ मिळवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली आहे. भाजप-शिवसेनेत युती झाली तरी आपण पक्षाचा राजीनामा देऊन खडसेंच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

यावरून खडसेंविषयी राग..

दरम्यान, 2014 मध्ये भाजप-शिवसेनेची युती तोडण्याचा निर्णय एकनाथ खडसेंनी जाहीर केला होता. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांत खडसेंविषयी प्रचंड राग आहे. त्यातच खडसे व पाटील यांच्यात राजकीय हाडवैर आहे. म्हणूनच 2014 मध्ये पाटील हे खडसेंविरोधात उभे होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही पाटील यांना मदत केली होती. तरी पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. यंदाही खडसेंविरुद्ध सर्वांनी एकत्रित सक्षम उमेदवार द्यावा, म्हणून पाटील प्रयत्नशील आहे. तसे झाल्यास भाजपचा एक गटही मदतीच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तर राष्ट्रवादीला शिवसेना मदत करणार..

राष्ट्रवादीने कोणताही नवखा उमेदवार दिल्यास त्याला शिवसैनिक मदत करण्याच्या तयारीत आहेत. तसेच पाटील स्वत: पाटील खडसेंच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. पाटील यांना सर्व खडसेविरोधक मदत करतील, अशीही शक्यता आहे.

Loading...

खडसेंच्या उमेदवारीबाबत संभ्रम कायम...

मुक्ताईनगरात एकनाथ खडसे लढणार की त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर याबाबतही काहीसा संभ्रम आहे. युती झाली किंवा नाही झाली तरी मुक्ताईनगरमध्ये शिवसेना ही भाजपपुढे आव्हान निर्माण करणार असल्याने या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भूखंड घोटाळ्याच्या आरोपांमुळे खडसेंची मंत्रिपदावरून गच्छंती झाली होती. खडसे पुन्हा निवडून आले तर त्यांना मंत्रिपद द्यावेच लागेल. दुसऱ्या टर्मसाठीही ते मुख्यमंत्र्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वेळी ते निवडून येऊ नयेत म्हणून जिल्ह्यातील खडसेंविरोधी गट सक्रिय झाला आहे.

अजित पवारांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 06:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...