बीड, 24 ऑगस्ट : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवस्वराज्य यात्रेच्या दुसरा टप्प्यातील पाथरी येथील भव्य सभेला शुक्रवारी (23 ऑगस्ट)संबोधित केले. यावेळेस त्यांनी जनतेला भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. 'आगामी विधानसभा निवडणूक माझ्यासाठी जीवन मरणाची आहे. प्रामाणिकपणानी गेल्या 24 वर्षांपासून तुमची अविरत सेवा केली. सर्वांच्या सुख, दुःखात सहभागी झालो, कधीच हात अखडता घेतला नाही. शंभर एकर जमीन विकून तुमची सेवा केली. लेकीला दोन वेळा आशीर्वाद दिला आहे, यंदा लेकाला आशीर्वाद द्या', असी धनंजय मुंडेंनी भावनिक साद घातली.
सत्तेत नसतानाही आदरणीय @PawarSpeaks साहेब आपल्यासाठी झिजतायत. एका हाकेत या परळीकरांसाठी सिमेंटची कंपनी आणली, ८० मेगावॅटचा प्रकल्प, ५०० कोटींची गुंतवणुक आणली. या मातीचं मी देण लागतो. आपल्या माणसाशी इमान राखातोय. तुमच्या उत्कर्षासाठीच पवार साहेबांचा आदर्श ठेवत कार्य करतोय. pic.twitter.com/933JFmUVpt
'परळीला विचारल्याशिवाय राज्याच्या राजकरणात पानदेखील हलणार नाही'
'राजकीय ताकतीचे काय घेवून बसलात परळी मतदार संघाची ताकद एवढी वाढवू की परळीला विचारल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकरणात पानदेखील हलणार नाही',असे म्हणत मुंडेंनी अजित पवारांसमोर परळीकरांना ग्वाही दिली.
'परळीच्या इतिहासात पहिल्यांदाच वाण धरण कोरडे पडले आणि माझ्या परळीची दशा झाली. जायकवाडीचे पाणी धरणात यावे ही स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची इच्छा होती, त्यांच्या वारसदारांना गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता दिली, मात्र ना जायकवाडीचे पाणी आले, ना वाण धरणाची उंची वाढली. परळीत MIDCसाठी मी प्रयत्न केले मात्र सत्ता असूनही आणि उद्योगपतींशी ओळख असूनही पालकमंत्र्यांना माझ्या भावांसाठी रोजगार निर्माण करता आले नाहीत', अशा शब्दात मुंडे पालकमंत्र्यांचे अपयश जनतेसमोर मांडले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे माझ्या परळीकरांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. खरंतर आजही दुष्काळात होरपळत असताना हा उत्सव साजरा कसा करावा हा प्रश्न मनात असतानाही,परळीकरांनी जे प्रेम दिलं, ज्या उत्साहाने स्वागत केलं त्याने मी भारावून गेलो. त्यांचे आभार मानतो. pic.twitter.com/TuECjMkhwf
यानंतर धनंजय मुंडेंनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्री असताना परळीत पंचतारांकित वसाहत उभारण्यासाठी दिवंगत मुंडेंनी प्रयत्न केले. मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. पण सिरसाळात 2200 एकर जमीन उपलब्ध असल्याचे पत्र आपण उद्योगमंत्र्यांना दिलं. त्यानंतर अधिकारी पाहणीसाठी आल्यानंतर आमच्या ताईंना लक्षात आला. त्यांच्या अनेक उद्योगपतींची ओळख आहे. मग परळीत एकही व्यवसाय का आणला नाही? असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला.
तसंच, परळीकरांच्या प्रत्येक अडचणीत आपण धावून जातो, मग माझ्या काय कमी आहे? ही निवडणूक माझ्या जीवन मरणाची असल्याचं म्हणत त्यांनी परळीकरांना भावनिक साद घातली.
VIDEO: नारायण राणे भाजपमध्ये येणार की नाही? मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट