दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात राजकीय फटाके, निवडणूक तारखांची झाली घोषणा

महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2019 03:11 PM IST

दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात राजकीय फटाके, निवडणूक तारखांची झाली घोषणा

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commision of India) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. राज्यात ऑक्टोबर 2014 विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते. दोन्ही राज्यातील विधानसभेचा कालावाधी लवकरच संपणार आहे.

288 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

अधिसूचना - 27 सप्टेंबर.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - 4 ऑक्टोबर.

Loading...

उमेदवारी अर्ज छाननी - 5 ऑक्टोबर.

उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख - 7 ऑक्टोबर

उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पर्यवेक्षक पाठवणार

2 नोव्हेंबरपूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार

2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात कुणाला किती जागा?

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

काय आहे हरियाणातील स्थिती?

हरियाणामध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. हरियाणात मागील निवडणुकीत 90 पैकी 47 जागांवर भाजपने विजय मिळवला होता आणि मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar)यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते.

VIDEO: मोदींच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 12:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...