काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देत महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप, तारीखही ठरली!

काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देत महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप, तारीखही ठरली!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 1 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीआधी राज्यात अनेक नेत्यांचा सत्ताधाऱ्यांकडे ओढा सुरू झाला आहे. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात निराशेचं वातावरण आहे. अशातच आता भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगाभरती होणार असून 10 ऑगस्टला काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते हाती कमळ घेणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच  पहिल्या टप्प्यानंतर 10 ऑगस्टला  भाजपमध्ये आणखी काही नेते पक्षप्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आघाडीला मात्र चांगलाच धक्का बसणार आहे.

आघाडीच्या नेते आणि भाजप प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुधवारी (31 जुलै) भाजपमध्ये पहिल्या टप्प्यातील मेगाभरती झाली. राष्ट्रवादी-काँग्रेस आणि काँग्रेसमधून आमदार, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं भाजपचं कमळ हाती घेतलं. राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, काँग्रेसचे कालीदास कोळंबकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा

आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर 'महाजनादेश यात्रा' अमरावती जिल्ह्यातून सुरू होत आहे. त्यामुळे युतीतील दोन्ही सत्ताधारी पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असताना अंतर्गत स्पर्धाही सुरू झाली आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.

मुंबई लोकलमध्ये 'पोलडान्स' करत तरुणाची स्टंटबाजी, VIDEO व्हायरल

Published by: Akshay Shitole
First published: August 1, 2019, 2:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading