Elec-widget

युतीतील संघर्षानंतर आघाडीतही बिघाडी? पिंपरीत काँग्रेस कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका

युतीतील संघर्षानंतर आघाडीतही बिघाडी? पिंपरीत काँग्रेस कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका

काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा तिढा सुटला असं वाटत असतानाच पिंपरी शहरातील काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी, 24 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांच्या घोषणेनंतरही युतीत जागावाटपावरून संघर्ष सुरू आहे. तर आघाडीतही काही जागांवर बिघाडी झाल्याचं दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा तिढा सुटला असं वाटत असतानाच पिंपरी शहरातील काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

'पिंपरी शहरातील तीन पैकी एक मतदारसंघ आम्हाला द्या, अन्यथा राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचारच करणार नाही,' अशी भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे इथं आघाडीत बिघाडी झाल्याचं बोललं जात आहे. आचारसंहिता जाहीर ह्योण्याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरीतील जागांवरून काँग्रेस कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं होतं. मात्र आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर मेळाव्यात पक्षाचे नेते अजित पवार यांनी शहरातील तीनही मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याचं सांगितलं. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

सध्या भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरावर याआधी राष्ट्रवादीचं अधिराज्य होतं. मात्र त्याआधीही हे शहर राज्याच्या राजकारणाचं सत्ताकेंद्र म्हणून ओळखल जायचं ते काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री आणि या शहरातील दिवंगत नेते प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांमुळे. त्यामुळे या शहरात काँग्रेसला पुन्हा सुगीचे दिवस परत आणण्यासाठी काँग्रेसकडून एका मतदार संघावर दावा सांगितला जात होता. मात्र तसं झालं नाही आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेवटी टोकाची भूमिका घेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं काम न करण्याचा इशारा दिला आहे.

पिंपरी शहरात काँग्रेस वगळता इतर पक्षात मोठ्या पदावर आरूढ झालेल्या आजच्या सर्व नेत्यांसह, विद्यमान खासदार आणि आमदार ही सगळी मंडळी काँग्रेसचीच देण आहे. मात्र पक्षनिष्ठेपेक्षा सत्तेचा मोह बाळगणाऱ्या या सर्वांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली आणि कधीकाळी या शहराचा राजकीय पाया उभारणारा काँग्रेस पक्ष धुळीस मिळाला. मात्र अशाही परिस्थितीत उरलेल्या कार्यकर्त्यांमध्ये लढण्याची जिद्द कायम आहे. त्यामुळे आता पिंपरीत राष्ट्रवादीकडून काँग्रेसला पाठिंबा मिळतो की पाठ दाखवली जाते, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

VIDEO : हेल्मेट घालून केली चोरी; विदेशी दारूसह 50000 लुटतानाची दृश्य CCTV मध्ये कैद

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 11:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...