मुख्यमंत्री, RSS आणि 50 कोटी; नाना पटोलेंनी केला 'हा' गंभीर आरोप

मुख्यमंत्री, RSS आणि 50 कोटी; नाना पटोलेंनी केला 'हा' गंभीर आरोप

यात्रेला सुरुवात होताच नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत.

  • Share this:

अमरावती, 26 ऑगस्ट : मुख्यमंत्री कार्यालयातून दर महिन्याला 50 कोटी रुपये संघ कार्यकर्त्यांवर खर्च केले जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने महापर्दाफाश यात्रा काढली आहे. अमरावतीतून या यात्रेला सुरुवात होताच नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातूनच महाजनादेश यात्रेला सुरुवात केली. त्यानंतर आता काँग्रेसच्या वतीने आजपासून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वात 'महापर्दाफाश' यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.

'गिरीश महाजन तर जोकरमंत्री'

सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरावरून नाना पटोले यांनी भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे. 'अलमट्टी धरणामुळे सांगली, कोल्हापूरवर पुराची स्थिती ओढवली. गिरीश महाजन हे जोकरमंत्री आहेत.' अशी जहरी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

गिरीश महाजन यांनी महापुरादरम्यान सेल्फी व्हिडिओ काढल्याने त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. हाच मुद्दा पकडत महापर्दाफाश यात्रेत नाना पटोले यांनी महाजनांवर जोरदार टीका केली आहे.

नाना पटोलेंचे गंभीर आरोप

सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीत टेंडर न काढता कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला

5 वर्षात ओबीसींची शिष्यवृत्ती थांबवली. हे सरकार sc, st, obc विरोधी आहे.

विकास केवळ देवेंद्र फडणवीस यांचा झाला. सरकारचे खाते अमृता फडणवीस या काम करत असलेल्या बँकेत वळते केले.

VIDEO:साध्वी प्रज्ञा पुन्हा बरळल्या, 'विरोधकांनी वाईट शक्तींचा वापर केल्यानं भाजपच्या नेत्यांचा मृत्यू'

Published by: Akshay Shitole
First published: August 26, 2019, 3:13 PM IST

ताज्या बातम्या