काँग्रेसला मोठा हादरा, माजी मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर?

काँग्रेसला मोठा हादरा, माजी मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर?

माजी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे काँग्रेसचे हे आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू झाली आहे.

  • Share this:

सातारा, 10 सप्टेंबर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना धक्कातंत्र देण्याचं काम भाजप-शिवसेनेकडून जोरदार सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आउटगोईंग मोठ्या प्रमाणात अजूनही सुरूच आहे. यातच आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जाणारे काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू झालीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्यानंतर पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आलं आहे.

या चर्चांमुळे काँग्रेस पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आनंदराव पाटील हे काँग्रेसचे विधान परिषदचे आमदार आहेत.  पृथ्वीराज चव्हाणांचे कट्टर विरोधक अतुल भोसले यांच्यासह आनंदराव पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची सोमवारी (9 सप्टेंबर) भेट घेतली. सुमारे 20 मिनिटे ही बैठक सुरू होती. पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यास चव्हाणांची कराड विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे.

(वाचा : मुख्यमंत्री शिवसेनेचा की भाजपचा? रामदास आठवले म्हणाले...)

सातारा जिल्हा काँग्रेसचे आनंदराव पाटील अनेक वर्षे अध्यक्ष राहिले आहेत. जिल्ह्यात त्यांना अत्यंत मान देणारा काँग्रेसचा एक वर्ग आहे.

(पाहा : VIDEO: वंचित आघाडीबाबत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली 'ही' इच्छा)

येत्या 13 सप्टेंबर रोजी विजयनगर येथे भव्य मेळावा घेऊन आनंदराव पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं जात आहे. या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

(वाचा : 'युती'चे नाराज नेते संपर्कात, काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याचा गौप्यस्फोट)

दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला लाचारी पत्करत भाजपसोबत युती करावी लागतेय. त्यामुळे अनेक बडे नेते नाराज आहेत. 'युती'चे हे बडे नेते तिकिटासाठी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. हे नेते कोण आहेत याचा खुलासा लवकरच होईल असंही त्यांनी सांगितलं. वडेट्टीवार म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांना आघाडीसोबत यायचंच नव्हतं. यामुळे त्यांनी कधीच चर्चा केली नाही धर्मनिरपेक्ष पक्षांना मदत न करता भाजपाला मदत करण्याचा त्यांचा अजेंडा आहे आणि हे सर्व कशासाठी करत आहेत हे पुढच्या काळात आपण सांगूच असा इशाराही त्यांनी दिला. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या फॉर्म्युल्यावरही त्यांनी  जोरदार टीका केली. काकाच्या आशीर्वादानेच पुतणे राजकारणात मोठे झाले आहेत हे अवधूत तटकरे विसरले त्यांचा शिवसेनेत जाण्याचा निर्णय आत्मघातकी ठरेल अशी टीकाही त्यांनी केली.

मोदी यांच्या शंभर दिवसाच्या सरकारने देशात मंदिर बनवलं, सर्व बेरोजगारी संपवली, विकास केला असा उपरोधक टोलाही त्यांनी लगावला. सरकार फक्त प्रचार करत असल्याचंही ते म्हणाले.VIDEO: युतीच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना खासदार अनिल देसाईंची EXCLUSIVE माहिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 10:19 AM IST

ताज्या बातम्या